बिहार निवडणूक २०२५: घटक पक्षांमध्ये ‘आपसातच लढती’, परंतु मैत्रीपूर्ण! ७ ठिकाणी आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 06:59 IST2025-10-21T06:57:09+5:302025-10-21T06:59:57+5:30
महाआघाडीचे घटक पक्ष सात जागांवर आमनेसामने आहेत.

बिहार निवडणूक २०२५: घटक पक्षांमध्ये ‘आपसातच लढती’, परंतु मैत्रीपूर्ण! ७ ठिकाणी आमने-सामने
पाटणा: महाआघाडीतील स्थिती अशी आहे की, कुठे भाकपने काँग्रेसच्या विद्यमान जागेवर उमेदवार दिला आहे, तर व्हीआयपी या पक्षानेही काँग्रेसच्या पारंपरिक जागेवर आपले उमेदवार उतरवले आहेत. एकूणच अनेक ठिकाणी आता ‘मैत्रीपूर्ण’ पण लढाया होणारच.
कुटुंबा जागेबाबत काँग्रेसला थोडा दिलासा आहे. कारण राजदने जाहीर केलेल्या १४३ उमेदवारांच्या यादीत या जागेचा समावेश नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम हे औरंगाबाद जिल्ह्यातील कुटुंबा जागेवरून उमेदवार असतील. ही आघाडी अनेक ठिकाणी केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र आहे.
७ ठिकाणी आमने-सामने
जागावाटप आणि तिकीटवाटपानंतरचे हे चित्र पाहता भाजप-काँग्रेस आणि राजद-व्हीआयपी अशा लढती यंदा होण्याची शक्यता आहे. महाआघाडीचे घटक पक्ष लालगंज, वैशाली, राजापाकर, बच्छवारा, रोसेरा, बिहार शरीफ आणि गौडाबोराम या सात जागांवर आमनेसामने आहेत.
आरजेडी व काँग्रेसनीही गौरवाबाौरम या जागेवर उमेदवार उभे केले आहेत. लालगंज मतदारसंघात काँग्रेसचे आदित्य कुमार व आरजेडीच्या शिवानी शुक्ला यांच्यात थेट लढत होत आहे. .’