“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 06:19 IST2025-10-22T06:15:04+5:302025-10-22T06:19:35+5:30
बिहारमधील जनतेला यंदा बदल हवा आहे. छठ उत्सवानंतर भ्रष्टाचार व सत्तेतील अंतर्गत खेळाचा खुलासा करू, असे प्रशांत किशोर म्हणाले.

“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरलेले ‘जनसुराज’चे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मंगळवारी भाजपवर गंभीर आरोप केले. भाजप ‘जनसुराज’चे उमेदवार फोडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राजकीय दबाव टाकून कुठे जनसुराजच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास वा काही मतदारसंघांत माघार घेण्यास भाग पाडले जात आहे. ते म्हणाले, भाजप महाआघाडीला नव्हे, जनसुराजला घाबरत आहे.
जनतेला बदल हवा
बिहारमधील जनतेला यंदा बदल हवा आहे. छठ उत्सवानंतर आपण भ्रष्टाचार व सत्तेतील अंतर्गत खेळाचा खुलासा करू, असे किशोर म्हणाले. कुम्हरारचे उमेदवार के. सी. सिन्हा दबावाला न जुमानता ठाम राहिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. जनसुराज पक्षाने यावेळी एकूण २४३ विधानसभा जागांपैकी २४० जागांवर उमेदवार उभे केले आहेत.