"बिहारचे रस्ते अमेरिकेसारखे बनवणार", नितीन गडकरींचे बिहारच्या जनतेला मोठे आश्वासन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:45 IST2025-11-04T13:45:12+5:302025-11-04T13:45:33+5:30
Bihar Assembly Election 2025 : "आम्ही प्रामाणिकपणे तुमची सेवा करण्यासाठी आलो आहोत."

"बिहारचे रस्ते अमेरिकेसारखे बनवणार", नितीन गडकरींचे बिहारच्या जनतेला मोठे आश्वासन...
Bihar Assembly Election 2025 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचारसभेत राज्याच्या विकासाबाबत मोठे आश्वासन दिले आहे. सारण जिल्ह्यातील मांझी विधानसभा क्षेत्रात एनडीए उमेदवार रणधीर सिंह यांच्या समर्थनार्थ झालेल्या सभेत बोलताना म्हटले की, “मी बिहारच्या रस्त्यांना अमेरिकेसारखे बनवणार आहे. एकापेक्षा एक उत्तम पूल उभारणार आहे. बिहारचे राष्ट्रीय महामार्ग जागतिक दर्जाचे बनवेन. हा माझा शब्द आहे.”
जनतेचा पैसा, आमची जबाबदारी
यावेळी नितीन गडकरी म्हणाले, “तो दिवस लांब नाही, जेव्हा बिहारच्या रस्त्यांचा दर्जा अमेरिकेसारखा असेल. मी हे कुठलाही उपकार म्हणून करत नाही. हे तुमचे पैसे आहेत. तुम्ही मालक आहात, आम्ही नोकर आहोत. आम्ही प्रामाणिकपणे तुमची सेवा करण्यासाठी आलो आहोत. म्हणूनच तुम्ही आम्हाला निवडले आहे.” गडकरी यांनी जनतेला उद्देशून सांगितले की विकासाचे श्रेय कोणत्याही नेत्याला नाही, तर जनतेलाच आहे.
#WATCH | Saran, Bihar: Union Minister Nitin Gadkari says, "...I promise to build Bihar's national highways as per world standards, and that day is not far off when I will make Bihar's roads on par with America's. This is my promise: I will build the best bridges. There are no… pic.twitter.com/RM7xopPqiT
— ANI (@ANI) November 4, 2025
ते पुढे म्हणाले, “जर तुम्ही जनार्दन सिंह यांना आणि एनडीएला मत दिले नसते, तर मोदीजी पंतप्रधान झाले नसते आणि मी मंत्रीही झालो नसतो. हे सर्व तुम्ही निर्माण केले आहे. म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो की, बिहारला समृद्ध, सुखी आणि शक्तिशाली बनवण्याचा आमचा निर्धार आहे.”
गडकरींनी X वर पोस्ट करत लिहिले की, बिहारच्या मांझी विधानसभा क्षेत्रातील जनतेचा आशीर्वाद एनडीएसोबत आहे. “गंगा आणि घाघरा नद्यांच्या संगमावर असलेला मांझी परिसर कृषीप्रधान आहे. शेतकरी आणि पशुपालकांच्या विकासासाठी एनडीए सातत्याने प्रयत्नशील आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे बिहारच्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत आहे. मला विश्वास आहे की, येथील जनता विकसित बिहारच्या संकल्पाला साकार करण्यासाठी एनडीएसोबत राहील,” असे त्यांनी नमूद केले.
📍मांझी, सारण, बिहार
बिहार के मांझी विधानसभा क्षेत्र से एनडीए के प्रत्याशी श्री रणधीर सिंह जी के समर्थन में आज जनसभा को संबोधित किया। गंगा और घाघरा नदियों के संगम पर स्थित मांझी क्षेत्र की अर्थव्यवस्था मुख्य रूप से कृषि पर आधारित है। किसानों और पशुपालक भाई-बहनों के विकास के लिए… pic.twitter.com/YuH9np7hVV— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 3, 2025
सारणमध्ये एनडीएचा प्रचार वेगात
नितीन गडकरींच्या सभेनंतर सारण आणि आसपासच्या भागात एनडीएचा प्रचार अधिक वेग घेताना दिसत आहे. गडकरींच्या वक्तव्यामुळे रस्ते विकास आणि पायाभूत सुविधा हे विषय पुन्हा प्रचाराच्या केंद्रस्थानी आले आहेत. बिहारमध्ये गेल्या काही वर्षांत महामार्ग विकासासाठी मोठे प्रकल्प सुरू आहेत आणि गडकरींच्या या घोषणेमुळे मतदारांमध्ये विकासाचा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे.