शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सत्तेत आल्यास दारुबंदीबाबत पुनर्विचार करणार, बिहारी जनतेला काँग्रेसचं आश्वासन

By बाळकृष्ण परब | Published: October 21, 2020 5:49 PM

Bihar Assembly Election 2020 News : बिहारमधील निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या महाआघाडीमध्ये मुख्य लढत होत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून जाहीरनाम्यामधून अनेक आश्वासने दिली जात आहेत.

ठळक मुद्देसत्तेत आल्यास दारुबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करू, काँग्रेसने दिले आश्वासन दारुबंदीमुळे राज्या्च्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर झाले नुकसान राज्य सरकार दारुबंदीबाबतच्या सकारात्मक हेतूपासून भरकटले आहे

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता ऐन रंगात आला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या महाआघाडीमध्ये मुख्य लढत होत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून जाहीरनाम्यामधून अनेक आश्वासने दिली जात आहेत. दरम्यान, काँग्रेसनेही बदलावपत्र या नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या बदलावपत्रामधून काँग्रेसचे बिहारी जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. त्यापैकी एक आश्वासन हे दारुबंदीबाबतही दिले आहे. सत्तेत आल्यास दारुबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करू असे आश्वासन काँग्रेसने बिहारमधील जनतेला या जाहीरनाम्यामधून दिले आहे.काँग्रेसने सांगितले की, दारुबंदीमुळे राज्या्च्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच राज्य सरकार दारुबंदीबाबतच्या सकारात्मक हेतूपासून भरकटले आहे. त्यामुळे राज्यात अवैध व्यापार होत आहे आणि पोलिसांना लाभ पोहोचवला जात आहे. मात्र जनता अजूनही त्रस्त आहे. अशा परिस्थित काँग्रेस सत्तेवर आल्यावर या निर्णयाचा योग्य तो पुनर्विचार करणार आहे.२०१५ मध्ये सत्तेत आल्यानंतर नितीश कुमार यांनी दारुबंदीचा निर्णय घेतला होता. तसेच हा एक मोठा निर्णय असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र निवडणुकीच्या काळात बिहारमध्ये अनेक ठिकाणी अवैध दारू पकडण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याशिवाय काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामधून अनेक महत्त्वपूर्ण आश्वसने दिली आहेत. यामध्ये १०० युनिटपर्यंत निम्मे वीजबिल, मुलींना स्कूटी, तरुणांना बेरोजगारी भत्ता, विधवांना पेन्शन, अशी आश्वासने देण्यात आली आहेत.दरम्यान, काँग्रेस प्रमाणेच लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनीही दारुबंदीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. केवळ दारुबंदी केल्याने महिला सशक्तीकरण झाले आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच दारुबंदीच्या निर्णयाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली नाही, असा दावाही त्यांनी केला होता.काँग्रेस बिहारमध्ये महाआघाडीचा घटक पक्ष आहे. या निवडणुकीत काँग्रेस एकूण ७० जागांवर निवडणूक लढवत आहे. बिहारमध्ये २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान, तीन टप्पांमधील मतदान आटोपल्यानंतर १० नोव्हेंबररोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसliquor banदारूबंदी