शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

नोटाबंदी हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेसचा घणाघाती आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 5:55 AM

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला तेव्हा त्याला काँग्रेसह सर्व विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला होता.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला तेव्हा त्याला काँग्रेसह सर्व विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला होता. आता या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. नोटाबंदी हा स्वतंत्र भारतातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे अशा आरोप करत काँग्रेस पक्षाने जोरदार निदर्शने केली. उत्तर प्रदेशात सपा, बसपानेही नोटाबंदीवरूनच मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.मायावती यांनी म्हटले आहे की, नोटाबंदीचा निर्णय घेताना मोदी सरकारने जनतेला दाखविलेल्या स्वप्नांपैकी एकही पूर्ण झालेले नाही. सपाचे नेते अखिलेश यादव यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींनी जनतेच्या सवालांना उत्तर देण्यासाठी ५० दिवस मागितले होते. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी झाली. त्यानंतर दोन वर्षे उलटली तरी मोदी या निर्णयाच्या परिणामांबद्दल तोंड उघडायला तयार नाहीत. या निर्णयामुळे देशातील बेकारी वाढली. त्यामुळे अर्थव्यवस्थाही अडचणीत आली आहे.काँग्रेसने नोटाबंदीविरोधात रिझर्व्ह बँकेच्या दिल्लीतील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. त्यात सहभागी झालेले अशोक गेहलोत, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, भूपेंद्रसिंह हुड्डा, सुष्मिता देव केशव यादव, मनीष चतरथ यांसह काही काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून संसद मार्ग ठाण्यात घेऊन गेले व काही वेळाने सुटका केली. गेहलोत यांनी निदर्शकांसमोर केलेल्या भाषणात सांगितले की, नोटाबंदी हा अर्थव्यवस्थेवर केलेला आत्मघाती हल्ला होता. दिल्ली, लखनौ, जयपूरसह संपूर्ण देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी नोटाबंदीविरोधात निदर्शने केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगढमध्ये आरोप केला की, नरेंद्र मोदी यांनी आपल्या सुटबुटवाल्या उद्योगपती मित्रांच्या मदतीसाठी नोटांबंदी केली. उद्योगपतींना आपला काळा पैसा पांढरा करता यावा यासाठी हा निर्णय घेतला.सुरजेवालांनी उजेडातआणले भाजपाचे कूकर्मंस्वतंत्र भारतातील नोटाबंदी हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला. या निर्णयाबाबत सात प्रश्न उपस्थित करून त्याची उत्तरे भाजपाने द्यावीत अशी मागणी त्यांनी केली होती. गुजरातमधील ज्या सहकारी बँका भाजपच्या ताब्यात आहेत त्यांना हाताशी धरून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न अमित शहा यांनी केल्याचा आरोप सुरजेवालांनी केला होता. सहकारी बँकांची आरटीआयद्वारे मिळालेली कागदपत्रे त्यांनी आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ प्रसारमाध्यमांसमोर ठेवली होती. देशभरात भाजपसाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनींच्या व्यवहारांबाबतची कागदपत्रेही त्यांनी उजेडात आणली होती. या गैरव्यवहारांची मोदींनी चौकशी करावी अशी मागणीही सुरजेवालांनी केली होती.

टॅग्स :congressकाँग्रेस