नवी दिल्ली : चालू आठवड्यात २३ ते २७ जानेवारी दरम्यान बिग बझारने आपल्या ग्राहकांसाठी ‘सबसे सस्ते पाच दिन’ ही आकर्षक योजना जाहीर केली आहे. यात तीन हजार रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्यांना डिस्काउंटवर २० टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. मात्र, यासाठी रुपे डेबिट कार्ड वापरणे आवश्यक आहे.या सेलमध्ये ग्राहकांना घरगुती उपयोगाच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, कपडे, पादत्राणे, विविध प्रकारची खेळणी, किचनमध्ये वापरायचे साहित्य, गृहसजावटीसाठी लागणाºया वस्तू आदी विविध प्रकारची खरेदी करू शकतात. किमान पाचशे रुपयांची खरेदी करणाºया ग्राहकांना ७ टक्के जादा डिस्काउंट दिला जाणार आहे, तसेच किमान पाच हजारांची खरेदी करणाºया ग्राहकांना अधिकचा १० डिस्काउंट बिग बझारकडून दिला जाणार आहे.
उद्यापासून बिग बझारचे ‘सबसे सस्ते पाच दिन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 04:27 IST