Sleeper Vande Bharat Express Train Inaugural Run Time Table Announced: १७ जानेवारी २०२६ हा दिवस भारतीय रेल्वेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. चेअर कार स्वरुपातील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन लोकप्रियतेच्या शिखरावर असताना भारतीय रेल्वे आता स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी सज्ज झाली आहे.
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज
काही दिवसांपूर्वी स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रत्यक्ष प्रवाशांच्या सेवेत कधी येईल, याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली होती. दोन प्रोटोटाइप रेक, अनेक महिन्यांची ट्रायल, या दरम्यान आलेल्या अडचणी, निरीक्षणांनंतर केलेले महत्त्वाचे बदल असे अनेक टप्पे पार करत अखेरीस वंदे भारत ट्रेन स्लीपर व्हर्जन भारतीय रुळांवर धावताना दिसणार आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात सामान्य प्रवाशांसाठी आतापर्यंत देण्यात आल्या नाहीत, अशा अनेक सोयी, सुविधा स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये पाहायला, अनुभवायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चेअर कार वंदे भारत ट्रेनच्या अभूतपूर्व यशानंतर आता स्लीपर वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
कामाख्या-हावडा-कामाख्या वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसला मान्यता
रेल्वे मंत्रालयाने २७५७६/२७५७५ कामाख्या-हावडा-कामाख्या वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसला मान्यता दिली आहे. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावेल. स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या लोकार्पणामुळे पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमधील संपर्क मजबूत होईल आणि व्यापार, पर्यटन आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे म्हटले जात आहे. ही अत्याधुनिक ट्रेन बीईएमएलने आयसीएफ टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने विकसित केली आहे. १६ कोच असलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची रचना कमाल १८० किमी/ताशी वेगासाठी केली आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन विशेषतः लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी डिझाइन केलेली आहे. यामुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मिळतो.
हो… अगदी खरे आहे… ‘वंदे भारत’हून वेगवान, शताब्दीपेक्षा सुपरसेवा; तिकीट फक्त ₹५! कोणती ट्रेन?
पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन फेरीचे टाइमटेबल आले
नवीन सेवा सुरू होण्यापूर्वी रेल्वे एक उद्घाटन विशेष ट्रेन चालवेल. ट्रेन क्रमांक ०२०७५ मालदा टाउन-कामाख्या वंदे भारत स्लीपर स्पेशल ट्रेन शनिवार, १७ जानेवारी २०२६ रोजी मालदा टाउन येथून दुपारी १:०० वाजता निघेल. रेल्वेनुसार, ही उद्घाटन विशेष ट्रेन वेळापत्रकानुसार विविध स्थानकांवर थांबून कामाख्या येथे पोहोचेल. त्यानंतर हावडा-कामाख्या-हावडा मार्गावर नियमित सेवा पुन्हा सुरू होईल.
दरम्यान, देशातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे प्रवाशांमध्ये लक्षणीय उत्साह निर्माण होत आहे. आधुनिक इंटीरियर, सुधारित सस्पेंशन, आरामदायी स्लीपर कोच आणि हायस्पीड यामुळे स्लीपर वंदे भारत पारंपारिक ट्रेनपेक्षा वेगळी ठरते. ही ट्रेन ईशान्य भारतासाठी गेम-चेंजर ठरेल असा रेल्वे अधिकाऱ्यांचा विश्वास आहे.
पहिल्या स्लीपर वंदे भारत उद्घाटन विशेष ट्रेनचे तपशीलवार वेळापत्रक आणि थांबे
| स्टेशनचे नाव | आगमन (Arrival) | प्रस्थान (Departure) |
| मालदा टाउन | -- | ०१:०० दुपारी |
| अलुआबारी रोड जंक्शन | ०३:०० दुपारी | ०३:०५ दुपारी |
| न्यू जलपाईगुडी जंक्शन | ०३:४५ दुपारी | ०३:५५ दुपारी |
| जलपाईगुडी रोड | ०४:३० दुपारी | ०४:३५ दुपारी |
| न्यू कूचबिहार | ०५:४५ दुपारी | ०५:५० दुपारी |
| न्यू अलीपुरद्वार | ०६:०५ सायंकाळी | ०६:१० सायंकाळी |
| न्यू बोंगाईगाव जंक्शन | ०७:४० सायंकाळी | ०७:४५ सायंकाळी |
| रंगिया जंक्शन | ०९:१० रात्री | ०९:१५ रात्री |
| कामाख्या जंक्शन | १०:४५ रात्री | -- |
Web Summary : India's first Sleeper Vande Bharat Express inaugural run timetable is out. The train will run between Malda Town and Kamakhya, with multiple stops. It aims to boost connectivity in eastern India.
Web Summary : भारत की पहली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस का उद्घाटन टाइमटेबल जारी। ट्रेन मालदा टाउन और कामाख्या के बीच चलेगी, कई स्टॉप होंगे। इसका उद्देश्य पूर्वी भारत में कनेक्टिविटी को बढ़ावा देना है।