जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश, कुलगाम चकमकीत ३ दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 10:49 IST2023-11-17T10:47:38+5:302023-11-17T10:49:18+5:30

जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम लष्कराला मोठं यश मिळालं आहे.

Big success of Army in Jammu and Kashmir, 3 terrorists killed, 5 surrounded in Kulgam encounter | जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश, कुलगाम चकमकीत ३ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश, कुलगाम चकमकीत ३ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम लष्कराला मोठं यश मिळालं आहे. कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. यादरम्यान लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पाच दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे.  गेल्या बुधवारी, सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दोन अज्ञात दहशतवाद्यांना ठार केले.

छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान CRPF टीमवर नक्षलवाद्यांचा हल्ला, केला IED स्फोट

अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, सतर्क सैनिकांना एलओसीजवळ काही हालचाल दिसली आणि सुरक्षा दलांनी घुसखोरांना आव्हान दिले तेव्हा दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. आतापर्यंत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले असून अजुनही कारवाई सुरू आहे. २६ ऑक्टोबर रोजी कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता आणि २२ ऑक्टोबर रोजी बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करताना दोन दहशतवादी ठार झाले होते. जूनमध्ये एकूण ११ घुसखोरांना ठार केले.

Web Title: Big success of Army in Jammu and Kashmir, 3 terrorists killed, 5 surrounded in Kulgam encounter