भिमराव पांचाळेंच्या गजलांना मोठी दाद
By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:02+5:302014-12-23T00:04:02+5:30
भिमराव पांचाळेंच्या गजलांना मोठी दाद

भिमराव पांचाळेंच्या गजलांना मोठी दाद
भ मराव पांचाळेंच्या गजलांना मोठी दादपणजी: अंदाज आरशाचा वाटे खरा असावा... अशा एकापेक्षा एक उत्तम गजल सादर करुन गजल गायक भिमराव पांचाळे यांनी श्रोत्यांना स्वरांच्या रेशिम गाठीत बांधले. गजाल नवाज म्हणून ओळखले जाणारे भिमराव पांचाळे यांच्या सर्व गजलांना श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली.येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात सुर्या फाउंडेशनव्दारे सोमवारी आयोजित शाम- ए- गजल या हिंदी, मराठी, उर्दू गजल गायन कार्यक्रमाचे उद्घाटन गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी केले. यावेळी उद्योजक विनयकुमार मंत्रवादी, सुर्या फाउंडेशनचे सचीव संदीप बोरक र, प्रदिप म्हसके उपस्थित होते. जळणार्याला विस्तव कळतो, बघणार्याला नाही...जगणार्याला जीवन कळते पळणार्याला नाही... ही गजल सादर करताच रसिकांनी एकच टाळयांचा गडगडाट केला. त्यांनी सादर केलेला शेर तार्यांमधले अंतर सोडा, माणसामधले मोजा. जवळीकतेची गरज माणसा गृहतार्यांना नाही रसिकांच्या मनाला भिडला. हिंदी मराठी आणि उर्दू गजलांची हा कार्यक्र म नसून मौफिलच रंगवल्याचे श्रोत्यांच्या चेहर्यावर दिसत होते. पर्यावरणाचा होणारा विध्दंस लक्षात घेता यासंबंधी पांचाळे यांनी शेर ऐकवला की तोडाल वृक्ष जेव्हा ध्यानात हे असू द्या. कित्येक पाखरांचा तो आसरा असावा... भिमरावांच्या गजल गायनाने सभागृहाला एक वेगळाच रंग चढला होता तसेच श्रोते स्वत:चे भान हरपून गेले होते.