Tahawwur Rana : मोठा खुलासा! तेहव्वूर राणाला दहशतवाद्यांना पाकिस्तानचा निशान-ए-हैदर पुरस्कार द्यायचा होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 14:20 IST2025-04-11T13:56:12+5:302025-04-11T14:20:51+5:30

Tahawwur Rana : मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर तेहव्वूर राणा याला दहशतवाद्यांना पाकिस्तानचा निशान-ए-हैदर हा पुरस्कार मिळवून द्यायचा होता, असा खुलासा अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या अहवालात केला आहे.

Big revelation tahawwur Rana wanted to give Pakistan's Nishan-e-Haider award to terrorists | Tahawwur Rana : मोठा खुलासा! तेहव्वूर राणाला दहशतवाद्यांना पाकिस्तानचा निशान-ए-हैदर पुरस्कार द्यायचा होता

Tahawwur Rana : मोठा खुलासा! तेहव्वूर राणाला दहशतवाद्यांना पाकिस्तानचा निशान-ए-हैदर पुरस्कार द्यायचा होता

Tahawwur Rana : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला अखेर भारताता आणले. काल त्याला १८ दिवसांची NIA कोठडी सुनावण्यात आली आहे. तहव्वूर राणाला पटियाला हाऊस NIAच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा न्यायालयाची सुनावणी पूर्ण झाली. दरम्यान, आता तहव्वूर राणाबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने अहवालामधून काही खुलासे केले आहेत. 

राणाला बिर्याणी नको, थेट फाशीच द्या! लोकांचे प्राण वाचवणाऱ्या चहाविक्रेत्यासह अनेकांची मागणी

मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर, त्याने त्याचा मित्र डेव्हीडला सांगितले होते की, 'दहशतवादी पाकिस्तानमधील सर्वोच्च लष्करी पुरस्कार 'निशान-ए-हैदर' ला पात्र आहेत' , असा खुलासा अहवालातून झाला आहे. ( Tahawwur Rana )

मुंबईवर हल्ला होण्याआधी डेव्हिड याने रेकी केली होती. तो पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या सूचनेनुसार काम करत होता. या हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ६ अमेरिकन नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला. 

या हल्ल्यामध्ये जबाबदार असलेल्यांना शिक्षा झालीच पाहिजे,असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनीही म्हटले आहे. तहनव्वूर राणा याची आता एनआयए चौकशी करणार आहे. ( Tahawwur Rana )

हल्ल्याबाबत गुपिते उलगडणार

तहव्वूर राणाकडून हल्ल्यासंबंधीची सर्व गुपिते उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे एनआयएने म्हटले आहे. तहव्वूर राणा, डेव्हिड कोलमन हेडली उर्फ ​​दाऊद गिलानीसह, लष्कर-ए-तैयबा आणि हरकत-उल-जिहादी इस्लामीला दहशतवादी हल्ले करण्यात मदत केली होती. मुंबईतील ताज हॉटेल आणि ओबेरॉयसह दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेल्या ठिकाणी मोठ्या संख्येने परदेशी लोक उपस्थित होते. परदेशी नागरिकांवरही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ( Tahawwur Rana )

१८ दिवसांची NIA कोठडी

शुक्रवारी रात्री उशिरा न्यायालयाची सुनावणी पूर्ण झाली आणि राणाला १८ दिवसांची कोठडी बजावण्यात आली. राणाला गुरुवारी भारतात आणले गेले. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत दाखल झाली आणि त्याला भारतात आणण्यात आले. आता राणाचा ताबा एनआयएने घेतला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Big revelation tahawwur Rana wanted to give Pakistan's Nishan-e-Haider award to terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.