मोठा दिलासा! व्यावसायिक गॅसचा कोटा ५० टक्के वाढवला; केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 06:13 IST2026-03-23T06:13:29+5:302026-03-23T06:13:29+5:30
स्थलांतरित कामगारांसाठी ५ किलो सिलिंडरची विशेष तरतूदही करण्यात आली आहे.

मोठा दिलासा! व्यावसायिक गॅसचा कोटा ५० टक्के वाढवला; केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : व्यावसायिक एलपीजी ग्राहकांसाठी मोठी घोषणा करताना केंद्र सरकारने त्यांचा गॅस वाटपाचा कोटा आता ५० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
शहरांमधील गॅस वितरण प्रकल्पांना वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, स्थलांतरित कामगारांसाठी ५ किलो सिलिंडरची विशेष तरतूदही करण्यात आली आहे.
शहरांमध्ये पाइपद्वारे नैसर्गिक वायू (पीएनजी) वापर वाढवण्यासाठी ‘पेसो’ने सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन प्रकल्पांच्या अर्जांचा निपटारा आता केवळ १० दिवसांत करण्याचे आदेश देण्यात आले.