जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरूच आहे. दरम्यान, एनएसए अजित डोभाल पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी पोहोचले. ही बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. केंद्र सरकार दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाईसाठी रणनीती तयार करत आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उच्चस्तरीय बैठका घेत आहेत.
गेल्या काही दिवसांत, नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनएसए डोभाल, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान आणि लष्कर, नौदल आणि हवाई दल प्रमुखांसोबत अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या आहेत, यामुळे लष्कर-ए-तोयबा दहशतवादी गटाविरुद्ध लष्करी कारवाईच्या चर्चेला चालना मिळाली आहे.
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
गेल्या आठवड्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोवाल आणि जनरल चौहान यांनी भेट घेतली आणि सशस्त्र दलांना भारताच्या लष्करी प्रतिसादाची पद्धत, उद्देश आणि वेळ ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले.
केंद्रीय गृहसचिवांची मॉक ड्रिलवरील बैठक संपली
प्रभावी नागरी संरक्षणासाठी ७ मे रोजी देशभरात मॉक ड्रिल आयोजित केले जात आहेत. या संदर्भात, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी दिल्लीत बोलावलेली बैठक संपली.
भारत सरकार ७ मे २०२५ रोजी देशभरातील २४४ ओळखल्या जाणाऱ्या नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करणार आहे. क्षेपणास्त्र हल्ले किंवा हवाई हल्ले यासारख्या युद्धसदृश परिस्थितीत सामान्य जनता किती जलद आणि प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकते याची चाचणी करणे हा याचा उद्देश आहे.
या मॉक ड्रिलमध्ये सध्याची पसिस्थीती जाणून घेतली जाईल. यामध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजणे, शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित होणे, आश्रय घेण्याचा सराव करणारे लोक आणि आपत्कालीन सेवा जलद प्रतिसाद देणे यांचा समावेश असेल. या सरावाचा उद्देश भीती, गोंधळ कमी करणे आहे, अराजकता कमी करणे आणि जीव वाचवणे आहे.