शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

योगींच्या राज्यात लसीकरणाची मोठी तयारी; १ कर्मचारी १०० जणांना लस टोचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 11:50 AM

CoronaVirus Vaccine: तीन कंपन्यांनी भारत सरकारकडे आपत्कालीन लसीकरणाची परवानगी मागितली आहे. यामध्ये फायझर, सिरम आणि भारत बायोटेकने अर्ज केला आहे. या अर्जांवर विचार करण्यासाठी केंद्राची एका समितीने बुधवारी दुपारी चर्चा केली.

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये कोरोना लसीकरणावरून जोरदार तयारी सुरु झाली आहे. आरोग्य विभागाने याचा प्लॅनही तयार केला आहे. या योजनेनुसार ब्लॉक स्तरावर कॅम्प लावले जाणार आहेत. यामध्ये एक आरोग्य सेवक दररोज १०० लोकांना लस टोचणार आहे.  याचसोबत प्रमाणपत्रही दिले जाणार असून मोबाईलवर मेसेजही पाठविला जाणार आहे. 

तीन कंपन्यांनी भारत सरकारकडे आपत्कालीन लसीकरणाची परवानगी मागितली आहे. यामध्ये फायझर, सिरम आणि भारत बायोटेकने अर्ज केला आहे. या अर्जांवर विचार करण्यासाठी केंद्राची एका समितीने बुधवारी दुपारी चर्चा केली. यानंतरचा अहवाल आरोग्य मंत्रालयाला पाठविला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये लसीकरणाची तयारी सुरु करण्यात आली आहे. 

महासत्ता कोणीही असो! भारतच कोरोना लसीचा बादशाह; हा फोटो बरेच काही सांगतो

आरोग्य महासंचालक डॉ. डीएस नेगी यांनी सांगितले की, आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात लस पाठविली जाणार आहे. यानंतर ब्लॉक स्तरावर कॅम्प आयोजित केले जाणार आहेत.  यामध्ये प्रत्येक कर्मचारी १०० लोकांना लस टोचणार आहे. अशाप्रकारे दोन डोस दिले जाणार आहेत. पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. सीएमओ डॉ. संजय भटनागर यांच्यानुसार कोरोना लस दिल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. यासोबत लसीचा पहिला डोस दिल्यानंतर फॉर्ममध्ये दिलेल्या नंबरवर पहिल्या डोसची तारीख आणि दुसऱ्या डोसची तारीखचा मेसेज पाठवण्यात येणार आहे. 

लस टोचल्यानंतर त्या व्यक्तीला ३० मिनिटे निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. कोरोना लसीकरणासाठी कोल्ड स्टोरेजच्या तीन खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. पहिल्या खोलीत ज्यांना लस द्यायची आहे त्यांना थांबविण्यात येईल. दुसऱ्या खोलीत कोरोना लस दिली जाणार आहे. तर तिसऱ्या खोलीत डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली त्या व्यक्तींना ठेवण्यात येणार आहे. जर या काळात त्या व्यक्तीला काही समस्या उद्भवल्यास त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती केले जाणार आहे.

CoronaVaccine: कोरोना लसीसाठी 'या' अ‍ॅपवर रजिस्टर करावे लागणार

कोल्ड स्टोरेजलखनऊ आणि नोएडातील कोल्ड स्टोरेज राज्यातील मोठे असणार आहेत. स्टोरेज वाढविण्यासाठी केंद्राकडून जादा निधीची मागणीही करण्यात आली आहे. हे पैसे आले की राज्यातील अन्य जिल्ह्यांतही कोल्ड स्टोरेज बनविले जाणार आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या