शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवज्योत सिंग सिद्धू यांना काँग्रेसमध्ये मोठे स्थान? भाजप व अकाली दलाचेही निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 07:27 IST

Navjot Singh Sidhu : २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर पंजाबमधील काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी स्थानिक स्वराज्य संस्था खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

अमृतसर :  पंजाबमधील मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासोबत झालेल्या तीव्र मतभेदानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले नवज्योतसिंग सिद्धू हे सुमारे वर्षभर राजकारणात फारसे सक्रिय नव्हते; पण आता काँग्रेसने त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू केले असून, पक्षात त्यांना मोठे स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. सिद्धू यांनी आपल्या पक्षात यावे म्हणून शिरोमणी अकाली दल व भाजपनेही त्यांना निमंत्रण दिले आहे. 

२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर पंजाबमधील  काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी स्थानिक स्वराज्य संस्था खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यक्रमांतही ते फारसे दिसत नव्हते. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेती बचाव यात्रा काढण्यात आली. त्यात नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलेल्या भाषणाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. या यात्रेत सिद्धू यांनी सामील व्हावे यासाठी मनधरणी करण्याकरिता काँग्रेसचे पंजाबचे प्रभारी हरीश रावत हे त्यांच्या घरी गेले होते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी रावत यांनी सिद्धू यांच्याबरोबर न्याहारीदेखील केली. सिद्धू यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्याबाबत हरीश रावत यांनी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याशीही चर्चा केली आहे.   

लोकप्रियतेचा फायदा घेण्याची रणनीतीनवज्योतसिंग सिद्धू हे पंजाबमधील जनतेत लोकप्रिय आहेत. काँग्रेसमधील या नाराज नेत्याला आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी भाजप व शिरोमणी अकाली दल, हे दोन्ही पक्ष उत्सुक आहेत. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या लोकप्रियतेचा राजकीय फायदा घेण्याचा या दोन्ही पक्षांचा विचार आहे. मात्र, सिद्धू यांनी काँग्रेस पक्षातच राहावे यासाठी चाललेले प्रयत्न फलद्रूप होण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसBJPभाजपाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दल