मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 11:28 IST2025-04-24T11:28:20+5:302025-04-24T11:28:59+5:30

Pahalgam Terrorist Attack: जम्मू काश्मीर पोलिसांना दहशतवादी लपल्याची टीप मिळाली होती. यानुसार लष्कराला सोबत घेत संयुक्त ऑपरेशन राबविण्यात आले आहे.

Big news! Third encounter in Kashmir after Pahalgam terrorist attack; One jawan martyred | मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी सुरु केलेल्या संयुक्त सर्च ऑपरेशनवेळी दहशतवादी एका घरात लपलेले सापडले आहेत. सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांना घेरल्यानंतर चकमक सुरु झाली आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. 

जम्मू काश्मीर पोलिसांना दहशतवादी लपल्याची टीप मिळाली होती. यानुसार लष्कराला सोबत घेत संयुक्त ऑपरेशन राबविण्यात आले आहे. उधमपूरच्या बसंतगडमध्ये ही चकमक सुरु झाली आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधातील ही तिसरी चकमक आहे. कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. भारतीय लष्कराने पूंछमधील लसाना वनक्षेत्रात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन सुरु केले आहे. राज्यभरात सर्वत्र शोधमोहिम राबविण्यात येत आहे. 

पहलगामच्या बैसरन भागात सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जात आहे. परिसरातील जंगलात कोम्बिंग ऑपरेशनसाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण वनक्षेत्राला वेढा घालून ही मोहीम राबवली जात आहे. हल्ल्याच्या एका दिवसानंतर, पर्यटन स्थळी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

Web Title: Big news! Third encounter in Kashmir after Pahalgam terrorist attack; One jawan martyred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.