शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
3
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
4
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
5
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
6
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
7
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
13
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
14
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
15
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
16
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
17
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
18
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
19
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
20
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

मोठी बातमी! आजपासून मिळणार रेल्वेची Tatkal Ticket बुकिंग सेवा; असं करा तिकीट बुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 10:55 AM

मध्य रेल्वेच्या पीआरओ शिवाजी सुतार यांच्या माहितीनुसार ही सुविधा 30 जून आणि त्या नंतरच्या तारखेला धावणा-या गाड्यांसाठी सुरू होईल. 

नवी दिल्ली : देशभरातील २०० विशेष ट्रेन आणि देशातील निवडक १५ मार्गांवरून राजधानी ट्रेन धावत आहे. या ट्रेनचे २९ जूनपासून तत्काळ तिकीट मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रवासी ३० जूनच्या प्रवासाचे तिकीट आरक्षित करू शकतात, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद आहे. पण सध्या निवडक १५ मार्गांवर राजधानी विशेष ट्रेन तर आणि १ जूनपासून २०० स्पेशल ट्रेन चालविण्यात येत आहेत. भारतीय रेल्वेने कोरोना संकटात रेल्वे प्रवाशांसाठी तात्काळ तिकीट बुकिंग सेवा सुरू केली आहे. रेल्वेने चालविलेल्या विशेष प्रवासी गाड्यांमध्ये आणि एसी स्पेशल ट्रेन्समध्ये तत्काळ तिकिट बुकिंगची सेवा आजपासून सुरू झाली आहे. मध्य रेल्वेच्या पीआरओ शिवाजी सुतार यांच्या माहितीनुसार ही सुविधा 30 जून आणि त्या नंतरच्या तारखेला धावणा-या गाड्यांसाठी सुरू होईल. तात्काळ तिकिट बुकिंग केव्हा सुरू होईल? रेल्वे प्रवासी 30 जूनपासून प्रवासासाठी तत्काळ तिकिट सुविधेचा लाभ घेऊ शकतील. तत्काळ तिकिटे एसी क्लाससाठी सकाळी 10 पासून आणि सकाळी 11 पासून स्लीपर क्लाससाठी बुक केली जातील. 12 ऑगस्टपर्यंत सर्वसामान्य रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या आहेत. याबाबत गुरुवारी भारतीय रेल्वेने आदेश दिला आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसह सर्व सामान्य प्रवासी सेवा गाड्या 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत, असे या आदेशात म्हटले आहे. नवीन ऑर्डरवरून हे स्पष्ट झाले आहे की ,12 ऑगस्टपर्यंत आता फक्त विशेष गाड्या चालवता येतील.आता तात्काळ तिकीट कसे आणि केव्हा मिळेल? जर तुम्हाला द्वितीय श्रेणी किंवा स्लीपरसाठी तत्काळ तिकिटे बुक करायची असतील तर याची वेळ सकाळी 11 वाजता आहे. एसी तिकिटांसाठी बुकिंगची वेळ सकाळी 10 वाजता आहे. काही मिनिटांत किंवा बर्‍याच वेळा, तिकिटे सेकंदात संपतात. अशा परिस्थितीत आपण वेळेवर लॉग इन करणे किंवा काऊंटरपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. या नियमात बदल केल्याबद्दल रेल्वेकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, म्हणूनच आम्ही तुम्हाला आधीपासूनच सुरू असलेल्या नियमांबद्दल सांगत आहोत. तत्काळ तिकीट केव्हा बुक केले जाते, याबद्दल प्रवाशांमध्ये अनेकदा संभ्रम निर्माण होतो. समजा तुम्हाला 30 जूनला प्रवास करायचा असेल तर तुम्हाला तिकीट एक दिवसाआधीच म्हणजे 29  जून रोजी सकाळी १० किंवा अकरा वाजता बुक करावे लागेल. तत्काळ तिकिटांच्या बुकिंगवर तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्ष देण्याची गरज आहे, ती म्हणजे तुमच्या प्रवासादरम्यान आयडी असणे आवश्यक आहे. बरेच प्रवासी एकत्र असल्यास त्यातील एकाचा आयडी पुरेसा असेल, पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, केंद्र किंवा राज्य शासकीय कर्मचारी म्हणून ओळखपत्र, रेल्वे प्रवासादरम्यान बँक पासबुक, शाळा किंवा महाविद्यालय आयडी वैध असेल.  तत्काळ तिकीट रद्द केल्यास परतावा मिळणार नाही. संपूर्ण रक्कम रेल्वेमधून वजा केली जाते. ट्रेन रद्द झाल्यास तुम्हाला संपूर्ण पैसे परत मिळतील.

हेही वाचा

India China Faceoff: ...म्हणून भारत चीनसोबत आरपारच्या लढाईच्या पर्यायासाठी तयार

पेट्रोल अन् डिझेलचे भाव पुन्हा भडकले, जाणून घ्या आजचे दर

CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी

जवानांसोबतच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा, जून महिन्यातच ३८ अतिरेक्यांना केलं ठार

आजचे राशीभविष्य - 29 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज जीवनसाथी मिळणार

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी