शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
2
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
3
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
4
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी
5
अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा
6
T20 WC 2024 : पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात! गतविजेत्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन करण्यासाठी मैदानात
7
Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?
8
Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
9
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
10
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
11
“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
12
रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."
13
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
14
आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका
15
अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट
16
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
17
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
18
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
19
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवार मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
20
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी

पेन्शन बंद होण्याची चिंता सोडा! 31 डिसेंबरपर्यंत द्या हयातीचा दाखला; जाणून घ्या प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2020 4:44 PM

EPFO Pension : ईपीएफओ आता बऱ्याच अंशी डिजिटल होत आहे. पीएफ जमा करणे, बॅलन्स, काढण्यापासून ते आधारकार्ड, पॅनकार्ड आदींची माहिती ऑनलाईन अपडेट करता येते. मात्र, पेन्शनधारकांना दरवर्षी एक दाखला घेऊन पेन्शनसाठी बँकेत हेलपाटे मारावे लागतात.

देशभरातील पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही जिवंत असल्याचा दाखला (Life Certificate) जमा केला नसेल तर तुमची पेन्शन रोखली जाणार आहे. हे लाईफ सर्टिफिकिट दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जमा करावे लागते. ते आता 31 डिसेंबरपर्यंत जमा करता येणार आहे. यामुळे कोरोना किंवा आजारपणामुळे दाखला जमा करता आला नसेल तर तो जमा करण्यासाठी अजून दोन महिन्य़ांची मुदत देण्यात आली आहे. 

ईपीएफओ आता बऱ्याच अंशी डिजिटल होत आहे. पीएफ जमा करणे, बॅलन्स, काढण्यापासून ते आधारकार्ड, पॅनकार्ड आदींची माहिती ऑनलाईन अपडेट करता येते. मात्र, पेन्शनधारकांना दरवर्षी एक दाखला घेऊन पेन्शनसाठी बँकेत हेलपाटे मारावे लागतात. तुम्ही हयात आहात की नाही, याचा पुरावा बँकांकडे दरवर्षी द्यावा लागतो. अन्यथा पेन्शन बंद केली जाते. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत ठीक परंतू वयोवृद्धांना बँकांचे हेलपाटे मारणे खूपच त्रासदायक असते. बऱ्याचदा त्य़ांना आज नको उद्या या, असेही सांगितले जाते. ईपीएफओने या पेन्शनधारकांची अडचण ओळखली आहे.

ईपीएफओने हयात असल्याचे सर्टिफिकेट ऑनलाईन अपलोड करण्याची सुविधा दिली आहे. देशभरातील जवळपास 64 लाख लोकांना दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो. यावर्षी ऑफलाइन पद्धतीने लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याचा कालावधी 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत करण्यात आला आहे.

नोव्हेंबरमध्ये नाही दिला तरी चालेल...पण कोणाला?पेन्शनसाठी लाईफ सर्टिफिकेट न देण्याची मुभा दोन कारणांसाठी आहे. जर तुम्ही पेन्शनसाठी अर्ज करून वर्ष झाले नसेल तर. किंवा डिसेंबर 2019 व त्यानंतर हयातीचा दाखला दिला असेल तर. या दोन कारणांसाठी नोव्हेंबरमध्ये तुम्ही हयातीचा दाखला दिला नाही तरी चालू शकणार आहे. 

जवळचे सीएससी सेंटर कसे शोधाल? 

https://locator.csccloud.in/ या लिंकवर जाऊन तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आदींची माहिती टाकाव लागणार आहे. यानंतर तुम्हाला जवळचे सेंटर कुठे आहे याचा पत्ता दिला जाणार आहे. 

ऑनलाईन हयात दाखल कसा जमा कराल?-लाइफ सर्टिफिकेट ऑनलाइन पेन्शन डिस्बर्सिंग बँक, उमंग App किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून पाठविता येते.- डिजिटल सर्टिफिकेटसाठी पेन्शनर्सना युनिक प्रमाण आयडी जनरेट करावा लागेल. आधार क्रमांक आणि बायोमेट्रिकच्या माध्यमातून हे काम करता येईल.- आयडी जनरेट करण्यासाठी लोकल सिटिझन सर्व्हिस सेंटर जाऊ शकता ज्याठिकाणी आधार ट्रान्झेक्शन केले जाते. याशिवाय तुम्ही पेन्शन डिस्बर्सिंग एजन्सीच्या कोणत्याही शाखेत जाऊ शकता.- पेन्शनर्सना त्यांचा आधार नंबर, मोबाइल नंबर, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि पेन्शन अकाउंट नंबर देण्याबरोबरच बायोमेट्रिक देखील द्यावे लागेल. यानंतर नोंदणीबाबतचा एक SMS तुमच्या मोबाइलवर येईल. यामध्ये तुमचा प्रमाण ID असेल. यासाठी मोबाईल लिंक असणे गरजेचे आहे. 

Umang Appवर असा बनला हयातीचा दाखला-गुगल प्लेस्टोअरवर Umang App डाऊनलोड करा. त्यानंतर यामध्ये जीवन प्रमाणपत्र सेवा सर्च करा. यानंतर तुमच्या मोबाइलला बायोमेट्रिक डिव्हाइस कनेक्ट करा.- जीवन प्रमाणपत्र सुविधेअंतर्गत देण्यात आलेल्या General Life Certificate टॅबवर क्लिक करा. याठिकाणी पेन्शन प्रमाणीकरण टॅबमध्ये तुमचा आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक दिसेल. दोन्ही बाबी बरोबर असतील तर जनरेट ओटीपीवर क्लिक करा.- त्यानंतर याठिकाणी तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी सबमिट करा. त्यानंतर बायोमेट्रिक डिव्हाइसच्या मदतीन फिंगरप्रिंट स्कॅन करा.- बोटांचे ठसे जुळल्यानंतर तुमचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार होईल. सर्टिफिकेट पाहण्यासाठी तुम्ही व्ह्यू सर्टिफिकेटवर क्लिक करू शकता. आधार क्रमांकाच्या साहाय्याने सर्टिफिकेट पाहता येईल.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनProvident Fundभविष्य निर्वाह निधीbankबँकPost Officeपोस्ट ऑफिस