शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मोठी बातमी : केंद्र सरकार फौजदारी कायद्यात बदल करण्याची शक्यता; हालचाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 14:32 IST

केंद्र शासनाने भारतीय फौजदारी कायद्यात परिवर्तन करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या

ठळक मुद्देफौजदारी कायद्यांचा आढावा : पुण्यातील सिम्बायोसिस विधी महाविद्यालयाकडून प्रक्रियेत सहभाग 

पुणे : केंद्र शासनाने भारतीय फौजदारी कायद्यात परिवर्तन करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. प्रामुख्याने भारतीय दंड विधान, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा, अमली पदार्थ सेवन विरोधी कायद्यात सामान्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे आणि लोकाभिमुख बदल करण्यात येणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सिम्बायोसिस विधी महाविद्यालयाकडून फौजदारी कायद्याचा आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने जानेवारी महिन्यात महाविद्यालयाला यासंदर्भात पत्र पाठविले होते. त्यानंतर, पुन्हा जून महिन्यात गृह मंत्रालयाने महाविद्यालयासोबत पत्रव्यवहार करीत याविषयावर आवश्यक 'डाटा' गोळा करणे आणि कायद्यांचा आढावा घेणे तसेच शिफारशी देण्याबाबत कळविले होते. 

कायदेविषयक तरतुदी, कलमे आदी साहित्याचा आढावा महाविद्यालयाकडून घेतला जात आहे. फौजदारी कायद्यातील त्रुटी समजून घेण्यासाठी न्यायाधीश, सरकारी वकील, वकील, शिक्षणतज्ज्ञ, पोलीस, निम सरकारी संस्था, प्रसारमाध्यमे, तृतीय पंथी, मानसशास्त्रज्ञ, संशोधक, तज्ञ, न्यायवैद्यक अधिकारी, पॅरालीगल स्वयंसेवक, कारागृह अधिकारी यांच्यासह १२० हून अधिक घटकांकडून माहिती गोळा करण्यात आली आहे.  

कायदेशीर न्याय प्रणालीतील अंतर समजून घेण्यासाठी महाविद्यालयाने नुकतेच ‘भारतातील फौजदारी न्याय प्रणालीचे परिवर्तन’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रात सहभागी झालेल्या तज्ज्ञांच्या शिफारशी आणि मुद्द्यांचा एकत्रित अहवाल गृह मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. ठराविक विषयानुसार  सिम्बायोसिसच्या टीमने सुचवलेल्या शिफारशींचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक विषयानंतर ऑनलाईन  प्रश्नावली पाठवून त्यावरती ऑनलाईन पद्धतीनेच  मते घेण्यात आली.---------चर्चासत्रातील महत्वपूर्ण विषय १. पोलीस अधिकारी व सरकारी वकील यांच्यात समन्वय ठेवून शिक्षेमधील अपेक्षित वाढ२. ‘साक्षीदारांचे  संरक्षण ’ ३. फौजदारी खटल्यातील बळींचे संरक्षण आणि  अद्यावत पुनर्वसन४. खटले काढून टाकणेच्या तरतुदींचा गैरवापर५. कैद्यांना तुरूंगातून सोडण्यामुळे निर्माण होणारे प्रश्न६. सायबर अँड फॉरेन्सिक 

------या चर्चा सत्रात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम, अ‍ॅड. एस. के. जैन, अ‍ॅड. हितेश जैन, मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती  डॉ. शालिनी फणसाळकर- जोशी, आलोक अग्रवाल (संशोधन व धोरण सल्लागार, एन.ए.एल.एस.ए), अ‍ॅड. लतीका साळगावकर,  डॉ. हरीश शेट्टी, (मानसोपचारतज्ज्ञ), डॉ. एस. सी. रैना, (संचालक , केआयआयटी भुवनेश्वर), सुनील चौहान, (संचालक, एन.ए.एल.एस.ए), डॉ. हॅरोल्ड डीकोस्टा ( सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञ), भानुप्रताप बर्गे, (निवृत्त, सहायक पोलीस आयुक्त) आदी तज्ज्ञ सहभागी झाले होते. --------प्राध्यापक लास्या व्याकरणम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. शशिकला गुरपूर,  डॉ. बिंदू रोनाल्ड, चैत्राली देशमुख, डॉ. आत्माराम शेळके, शिरीष कुलकर्णी, डॉ. आशिष देशपांडे, ऍड. संग्रामजीत चव्हाण यांनी महाविद्यालयाकडून सहभाग नोंदविला.

टॅग्स :PuneपुणेsymbiosisसिंबायोसिसPoliceपोलिसAmit Shahअमित शहाCentral Governmentकेंद्र सरकार