मोठी बातमी! देशाच्या हद्दीत कोण येते? कधी येते सगळे समजणार; लोकसभेत स्थलांतर सुधारणा विधेयक संमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 19:21 IST2025-03-27T19:21:13+5:302025-03-27T19:21:33+5:30
Immigration And Foreigners Bill Passed In Lok Sabha: गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी लोकसभेत इमिग्रेशन सुधारणा विधेयक सादर केले. या विधेयकानुसार भारतात येणाऱ्या प्रत्येक परदेशी प्रवाशाचे एक खाते तयार होणार आहे, याद्वारे त्या लोकांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

मोठी बातमी! देशाच्या हद्दीत कोण येते? कधी येते सगळे समजणार; लोकसभेत स्थलांतर सुधारणा विधेयक संमत
स्थलांतर हा एक वेगळा मुद्दा नाही. देशातील अनेक प्रश्न त्याच्याशी जोडलेले आहेत. आपल्या देशाच्या हद्दीत कोण येते? ते कधी येते? ते किती काळासाठी येते? आणि ते कोणत्या उद्देशाने येते? देशाच्या सुरक्षेसाठी हे जाणून घेण्याचा अधिकार खूप महत्त्वाचा आहे, असे सांगत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत स्थलांतर सुधारणा विधेयक सादर केले, ते संमतही करण्यात आले.
गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी लोकसभेत इमिग्रेशन सुधारणा विधेयक सादर केले. या विधेयकानुसार भारतात येणाऱ्या प्रत्येक परदेशी प्रवाशाचे एक खाते तयार होणार आहे, याद्वारे त्या लोकांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. यामुळे भारतात येणाऱ्या लोकांचा डेटाबेस आपोआप तयार होणार आहे.
इमिग्रेशन आणि परदेशी लोकांबाबतचे विधेयक लोकसभेने मंजूर केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकावरील चर्चेला उत्तर दिल्यानंतर, विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्याची घोषणा केली.
स्वातंत्र्याच्या वेळी देशाची फाळणी घाईघाईत झाली आणि हिंदू आणि शिखांनी भरलेल्या गाड्यांची कत्तल करण्यात आली. तेव्हा नेहरूजी आणि गांधीजींनी सांगितले होते की तुम्ही तिथेच राहा. जेव्हा ते येतील तेव्हा त्यांना भारताचे नागरिक मानले जाईल. जे लोक येथे आपला धर्म आणि कुटुंब वाचवण्यासाठी आले आहेत ते खरे निर्वासित आहेत. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, कोणीही भारतात येऊ शकतो. तुमचे स्वागत आहे. घुसखोरी करण्यासाठी आलेल्यांवर आम्ही कडक कारवाई करू. फाळणीचे भयानक परिणाम सहन करणाऱ्यांनाच आम्ही नागरिकत्व देऊ, असे शाह यांनी म्हटले.