नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 18:30 IST2026-04-06T18:28:30+5:302026-04-06T18:30:21+5:30

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये २५ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला पती हंसा सिंग अचानक परतला. मात्र, पत्नीचा दीराशी विवाह झाला असून त्यांना ३ मुले आहेत. वाचा या नात्यांच्या अजब पेचाची हृदयद्रावक कहाणी.

Big embarrassment in relationships! Husband reappears after 25 years, wife marries sister-in-law; Whose skunk should be wiped? | नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?

नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील नहटौर कस्बेमधून एक अशी हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्याने नातेसंबंध, सामाजिक परंपरा आणि कायदा या तिन्हींना एकाच वेळी प्रश्नांच्या कचाट्यात पकडले आहे. २५ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला हंसा सिंग नावाचा व्यक्ती अचानक जिवंत सापडला आहे. मात्र, त्याच्या पुनरागमनाने एका सुखी कुटुंबात भावनिक वादळ निर्माण केले आहे.

पंजाबच्या कपूरथला जिल्ह्यातील रहिवासी असलेले हंसा सिंग २५ वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबाने बराच शोध घेतला, पण काहीही सुगावा लागला नाही. अखेर तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सामाजिक रितीरिवाजांनुसार हंसा सिंग यांना मृत मानण्यात आले. त्यानंतर, त्यांची पत्नी विमला देवी यांचा विवाह हंसा सिंग यांचा धाकटा भाऊ सुखा सिंग यांच्याशी लावून देण्यात आला. विमला देवी यांनी आपले नवीन आयुष्य स्वीकारले आणि गेल्या २२ वर्षांपासून त्या सुखा सिंग यांच्यासोबत संसार करत आहेत. या काळात त्यांना तीन मुलेही झाली. त्यांचे आयुष्य सुरळीत सुरू होते, पण अचानक हंसा सिंग यांच्या येण्याने सर्वच विस्कळीत झाले आहे.

तीन दिवसांपूर्वी नहटौरच्या बाजारात एक फाटलेल्या कपड्यातील, वाढलेली दाढी असलेला वृद्ध व्यक्ती भटकताना दिसला. नहटौर पोलीस स्टेशनचे प्रभारी रविंद्र प्रताप सिंग यांनी त्याची चौकशी केली. सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता, पण हळूहळू त्याने आपले नाव हंसा सिंग आणि पत्ता पंजाबचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी गुगल सर्च आणि पंजाबी भाषेच्या जाणकारांच्या मदतीने पंजाब पोलिसांशी संपर्क साधला आणि ७२ तासांत त्याचे कुटुंब समोर आले.

भावनिक आणि कायदेशीर पेच
हंसा सिंग यांना पाहताच त्यांच्या आईच्या (जट्टो कौर) आणि भावाच्या डोळ्यांत पाणी आले. मात्र, खरी अडचण विमला देवी यांच्यासमोर आहे. 

पहिला पती: हंसा सिंग (ज्यांच्याशी २५ वर्षांपूर्वी लग्न झाले होते).

दुसरा पती: सुखा सिंग (ज्यांच्याशी २२ वर्षांपासून संसार आहे आणि तीन मुले आहेत).

आता विमला देवी यांनी कोणासोबत राहावे? हा केवळ भावनिक प्रश्न नसून तो कायदेशीर आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत गुंतागुंतीचा झाला आहे.

Web Title : 25 साल बाद लौटा पति, पत्नी ने की दूसरी शादी: किसका सिंदूर?

Web Summary : 25 साल बाद एक आदमी लौटा, केवल यह जानने के लिए कि उसकी पत्नी ने उसके भाई से दूसरी शादी कर ली है और उसके तीन बच्चे हैं। यह स्थिति एक जटिल कानूनी और भावनात्मक दुविधा प्रस्तुत करती है, जो सामाजिक मानदंडों और पारिवारिक बंधनों को चुनौती देती है। महिला अब अपने अतीत और वर्तमान के बीच फटी हुई है।

Web Title : Husband Returns After 25 Years, Wife Remarried: Whose Sindoor?

Web Summary : A man returned after 25 years, only to find his wife remarried to his brother and with three children. The situation presents a complex legal and emotional dilemma, challenging societal norms and family bonds. The woman is now torn between her past and present.