शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

मोदी सरकारचा मोठा निर्णय...! कर्करोगाच्या औषधांवरील GST घटवला; अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पातच केली होती घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 21:13 IST

इन्शोरेन्सवरील जीएसटीचे प्रकरण ग्रुप ऑफ मिनिस्टर्सकडे...

जीएसटी काउन्सीलने कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जीएसटी परिषदेची ५४ वी बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता कर्करोगावरील औषधांवर 12 टक्क्यांऐवजी 5 टक्के एवढा जीएसटी लावण्यात येणार आहे. मात्र, आरोग्य आणि जीवन विम्याच्या प्रीमियम पेमेंटवरील जीएसटीसंदर्भात काउन्सिलने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. याशिवाय, धार्मिक यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेचा वापर केल्यास आता 18 टक्क्यांऐवजी 5 टक्के जीएसटीच द्यावा लागणार आहे. इन्शोरेन्सवरील जीएसटीचे प्रकरण ग्रुप ऑफ मिनिस्टर्सकडे -या बैठकीत हेल्थ इन्शोरन्स (Health Insurance) आणि लाइफ इन्शोरन्सच्या (Life Insurance) प्रीमियमवर लागणारा जीएसटी कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली. यानंतर हे प्रकरण अधिक अभ्यासासाठी ग्रुप ऑफ मिनिस्टर्सकडे (GOM) पाठवण्यात आले. जीओएमला ऑक्टोबर, 2024 पर्यंत आपला अहवाल तयार करावा लागेल. यावर आता नोव्हेंबर, 2024 मध्ये होणाऱ्या जीएसटी काउंसिल च्या बैठकीत चर्चा होईल.

धार्मिक यात्रेसाठी हेलीकॉप्टर सर्व्हिसवर आता 5 टक्के जीएसटी -या बैठकीत धार्मिक यात्रा करणाऱ्यांनाही दिलासा देण्यात आला आहे. धार्मिक यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेचा वापर केल्यास आता 18 एवजी 5 टक्के एवढाच जीएसटी भरावा लागणार आहे. उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रेमचंद अग्रवाल यांनी एएनआयला ही माहिती दिली. ते म्हणाले, जीएसटी परिषदेने आमची मागणी मान्य केली आहे. मात्र, ही सुविधा शेअरिंग हेलिकॉप्टर सेवा घेणाऱ्यांनाच मिळणार आहे. चार्टर्ड हेलिकॉप्टर सेवेचा लाभ घेतल्यास 18 टक्के एवढाच जीएसटी भरावा लागेल.

शैक्षणिक संस्थांना संशोधनासाठी मिळणाऱ्या अनुदानावरील जीएसटीचा मुद्दा फिटमेंट समितीकडे - याच बरोबर, जीएसटी काउन्सीलने सध्या शैक्षणिक संस्थांना संशोधनासाठी मिळणाऱ्या अनुदानावरील जीएसटीचा मुद्दा फिटमेंट समितीकडे पाठवला आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर जीएसटी परिषद यासंदर्भात निर्णय घेईल. याशिवाय ऑनलाइन पेमेंटवरील जीएसटीचे प्रकरणही फिटमेंट कमिटीकडे पाठवण्यात आले आहे. या समितीमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांशिवाय सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश आहे.

टॅग्स :cancerकर्करोगNarendra Modiनरेंद्र मोदीnirmala sitharamanनिर्मला सीतारामनHealthआरोग्य