पंजाब काँग्रेसला मोठा धक्का; रवनीत सिंग बिट्टूंचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 06:07 PM2024-03-26T18:07:30+5:302024-03-26T18:09:41+5:30

पंजाबमध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवनीत सिंग बिट्टू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Big blow to Punjab Congress Ravneet Singh Bittu joins BJP | पंजाब काँग्रेसला मोठा धक्का; रवनीत सिंग बिट्टूंचा भाजपमध्ये प्रवेश

पंजाब काँग्रेसला मोठा धक्का; रवनीत सिंग बिट्टूंचा भाजपमध्ये प्रवेश

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंजाबकाँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाबकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवनीत सिंग बिट्टू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते लुधियानाचे विद्यमान खासदार आहेत. रवनीत सिंग बिट्टू हे राहुल गांधींचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. ते पंजाब काँग्रेसचा मोठा चेहरा मानले जातात.

रवनीत सिंग बिट्टू यांनी मंगळवारी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. पक्षाच्या मुख्यालयात भाजप नेते विनोद तावडे यांनी त्यांना सदस्यत्वाचे पत्र देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पंजाब भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

ओडिशानंतर आणखी एका राज्यात युती तुटली; भाजपाने घेतला स्वतंत्र लढण्याचा निर्णय

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रवनीत सिंग बिट्टू यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. "माझे अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी गेल्या १० वर्षांपासून संबंध आहेत. मी शहीद कुटुंबातील आहे, मी पंजाब अंधारात होता तो काळ पाहिला आहे आणि बाहेर येतानाही पाहिले आहे. पंजाबमधील परिस्थिती लक्षात घेऊन मी हा निर्णय घेतला असल्याचे  रवनीत सिंह बिट्टू  म्हणाले. सरकार आणि पंजाब यांच्यात सेतू म्हणून काम करेन. आपण सर्वांनी मिळून काम करावे अशी माझी इच्छा आहे, असंही रवनीत सिंह बिट्टू म्हणाले. 

पंजाब काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक असलेले रवनीत सिंग बिट्टू तीन वेळा खासदार आहेत. २००९ मध्ये ते आनंदपूर साहिबमधून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर ते २०१४ आणि २०१९ मध्ये लुधियाना मतदारसंघातून खासदार झाले. रवनीत बिट्टू हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, जेपी नड्डा यांचे आभार मानले. 

Web Title: Big blow to Punjab Congress Ravneet Singh Bittu joins BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.