विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत AAP ला मोठा धक्का, ५ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 17:39 IST2024-08-25T17:38:01+5:302024-08-25T17:39:44+5:30
AAP News: मागच्या काही काळापासून दिल्लीतील सत्ताधारी असलेला आम आदमी पक्ष अनेक कारणांमुळे अडचणीत सापडलेला आहे. दरम्यान, पुढील वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत AAP ला मोठा धक्का, ५ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
मागच्या काही काळापासून दिल्लीतील सत्ताधारी असलेला आम आदमी पक्ष अनेक कारणांमुळे अडचणीत सापडलेला आहे. दरम्यान, पुढील वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. आपच्या दिल्लीतील पाच नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या नगरसेवकांनी आज भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं.
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या पाच नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये राम चंद्र, पवन सेहरावत, मंजू निर्मल, सुगंधा बिधुडी, ममता पवन, यांचा समावेश आहे.
दरम्यान, या पक्षांतरावर आम आदमी पक्षाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. आपच्या प्रवक्त्यांनी आरोप केला की, या नगरसेवकांवर पक्षांतरासाठी भाजपाकडून दबाव आणण्यात आला होता. तसेच त्यांना भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी भाग पाडण्यात आले. हा लोकशाहीविरोधातील कट आहे. तसेच भाजपाच्या या कटकारस्थानांमुळे दिल्लीचे मतदार विचलित होणार नाहीत, असा इशाराही आम आदमी पक्षाकडून देण्यात आला आहे.