शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये काँग्रेसला मोठं भगदाड! राहुल गांधींची यात्रा पुढे सरकताच 150 नेते भाजपात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 10:58 IST

मंत्री पीयूष हजारिका यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, 150 हून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून बाहेर पडताच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, AASU अर्थात ऑल आसाम स्टूडेंट्स युनियन आणि काँग्रेसच्या 150 हून अधिक नेत्यांनी भाजपचा भगवा हाती घेतला आहे. काँग्रेसची यात्रा सध्या तृणमूल काँग्रेसचे सरकार असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आहे. 

मंत्री पीयूष हजारिका यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, 150 हून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली. त्यांनी रविवारी लिहिले की, 'मला हे मानावे लागेल की राहुल गांधी यांच्या भारत बस न्याय यात्रेने आसाममध्ये मोठा प्रभाव पाटला आहे. आसाम काँग्रेस आणि AASU च्या 150 हून अधिकन नेत्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश  केला आहे. अंकिता दत्ता, बिस्मिता गोगोई आणि दीपांक कुमार नाथ यांनी चांगाला निर्णय घेतला आहे.'

महत्वाचे म्हणजे, दत्ता यूथ काँग्रेस आसामच्या माजी अध्यक्ष होत्या. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला होता. यानंतर, एप्रिल 2023 मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने (AICC) 'पक्षविरोधी कारवाई'चा ठपका ठेवत त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले होते. 

याच मुद्द्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही काँग्रेरच्या या यात्रेवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले, 'आपल्या राजकीय कारकिर्दीत आपण पहिल्यांदाच अशी 'न्याय यात्रा' बघत आहोत. जी ज्या ठिकाणावरून जात आहे, तेथे पक्षाचा पराभव होत आहे आणि तेथील पक्ष कार्यकर्तेही त्यांची विचारधारा सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.'

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाAssamआसाम