शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

Chhattisgarh Assembly Election Results: छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठा धक्का, काँग्रेसला मिळालं बहुमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 10:56 IST

छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018: छत्तीसगडमधल्या हाती आलेल्या निकालानुसार भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

रायपूर- छत्तीसगडमधल्या हाती आलेल्या निकालानुसार भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस 58 जागांवर पुढे असून, भाजपा काँग्रेसच्या तुलनेत मागे पडलं आहे. तर भाजपा 26 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही मोठा जल्लोष केला आहे. अजित जोगी आणि मायावतींची आघाडी दोन जागांवर पुढे असून, अजित जोगींनाही जनतेनं सपशेल नाकारलं आहे.छत्तीसगडमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भाजपाच्या रमण सिंह यांचं सरकार आहे. रमण सिंह यांनी सत्ता काळात गोरगरिबांना स्वस्त दरात तांदूळ उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे जनमानसांत त्यांची चावलवालेबाबा अशीही प्रतिमा तयार झाली होती. परंतु त्यांच्या या प्रतिमेचा भाजपाला फायदा झाला नाही. तसेच त्यांनी नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तरमध्ये आदिवासींसाठी अनेक योजना पोहोचवल्या होत्या. परंतु तरीसुद्धा भाजपाला जनतेनं झिडकारलं आहे. 

एकीकडे अजित जोगींनी काँग्रेसची साथ सोडून मांडलेली वेगळी चूल आणि मायावतींशी केलेली आघाडी यामुळे काँग्रेसच्या मतांचं धुव्रीकरण होण्याची शक्यता होती. पण अजित जोगी जाऊनही याचा काँग्रेसच्या मतांवर काहीही परिणाम झाल्याचं दिसत नाही.उलट काँग्रेसला जनतेनं भरभरून मतं दिली आहेत. विशेष म्हणजे छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री रमण सिंह यांना राजनांदगाव या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शुक्ला हे कडवी झुंज देत असतानाही राज्यात भाजपाची पिछेहाट झाली आहे. काँग्रेसनं 57 जागांवर आघाडी घेऊन स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.  त्यामुळे छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे.

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Chhattisgarh Assembly Election Resultछत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल