शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

महाठक! गृहमंत्रालयाचा संयुक्त सचिव बनून घातला 1 कोटी रुपयांचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 18:53 IST

अक्षयकुमारच्या स्पेशल 26 या चित्रपटात बनावट इन्कम टॅक्स ऑफिसर बनून एक टोळीने लोकांना गंडा घातल्याचे तुम्ही पाहिजे असेलच. काहीसा असाच प्रकार उघडकीस आला आहे.

फरिदाबाद - अक्षयकुमारच्या स्पेशल 26 या चित्रपटात बनावट इन्कम टॅक्स ऑफिसर बनून एक टोळीने लोकांना गंडा घातल्याचे तुम्ही पाहिजे असेलच. काहीसा असाच प्रकार फरिदाबादमध्ये उघडकीस आला आहे. येथे एका महाठकाने  गृहमंत्रालयाचा बनावट संयुक्त सचिव बनून तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या ठकाच्या मुसक्या आवळून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. तसेच त्याच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली कार, चेकबूक आणि संबंधिक कागदपत्रे जप्त केली आहेत.  आरोपीने एका व्यक्तीला धर्मादाय रुग्णालय उघडण्यासाठी परदेशामधून 735 कोटी रुपये देणगी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. याबाबत अधिक माहिती अशी की,  शहरातील सेक्टर 18 मधील  सैनिक कॉलनीमधील रहिवाशी राजेश जैन हे गेल्यावर्षी सुवेंदु शेखर यांच्या संपर्कात आले होते. आचार्य याने स्वत:ची ओळख भारत सरकारच्या गृहमंत्रालयातील संयुक्त सचिव अशी करून दिली होती.  तसेच फिर्यादीला धर्मादाय रुग्णायल उघडण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने फिर्यादीला धर्मादाय रुग्णालय उघडण्यासाठी मंजुरी आणि परदेशातून 735 कोटी रुपये निधी मंजुर झाल्याची खोटी कागदपत्रे दिली. तसेच फिर्यादी राकेश जैन आणि त्यांचे निकटवर्तीय बलबीर सिंह यांच्याकडून एक कोटी रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा करून घेतले. त्यानंतर आरोपीने आपला फोन बंद केला. तसेच आपल्या कुटुंबासह फरार झाला. अखेर राजेश जैन यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली.  त्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवत सुवेंदू शेखर आचार्य ऊर्फ मातरू प्रसाद सेठी याच्या मुसक्या आवळल्या. हा आरोपी ओदिशामधील रहिवाशी आहे. तसेच त्याच्यावर बाडबील (ओदिशा) आणि मथुरा (उत्तर प्रदेश) येथेही एक एक खटला सुरू आहे. सुवेंदूच्या मुसक्या आवळल्यानंतर तेथील पोलीस ठाण्यांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.  पोलिसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सुवेंदू हा केवळ 12वी पर्यंत शिकलेला आहे. मात्र तो स्वत:ची ओळख संयुक्त सचिव, एफसीआरए ब्रँच, गृह मंत्रालय, भारत सरकार अशी करून देत तो परदेशातून मदत प्राप्त करू इच्छिणाऱ्या एनजीओ आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत असे. त्यानंतर परदेशातून मदतनिधी मंजूर झाल्याची खोटी कागदपत्रे देऊन पैसे उकळत असे.   

टॅग्स :Crimeगुन्हाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस