5 ऑगस्टला राम मंदिरचे भूमीपूजन?, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीवर मात्र 'सस्पेंस'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 03:52 PM2020-07-18T15:52:10+5:302020-07-18T15:58:41+5:30

नृपेंद्र मिश्रा 16 जुलैपासून अयोध्येत आहेत. त्यांच्यासोबत बीएसएफचे माजी महासंचालक आणि राम जन्मभूमी ट्रस्टचे संरक्षण सल्लागार के के शर्मादेखील पोहोचले आहेत. याशिवाय मोठ-मोठ्या अभियंत्यांचा चमूही अयोध्येत उपस्थित आहे.

Bhoomi poojan for Ayodhya Ram temple likely on 5th august 2020 pm modi may visit ayodhya to attend | 5 ऑगस्टला राम मंदिरचे भूमीपूजन?, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीवर मात्र 'सस्पेंस'

5 ऑगस्टला राम मंदिरचे भूमीपूजन?, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीवर मात्र 'सस्पेंस'

Next
ठळक मुद्देट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहून भूमी पूजनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे.महंत कमल नयन दास यांनी पूर्वीच सांगितले होते, की श्रावन महिन्यातच राम मंदिर निर्माणाचे भूमीपूजन करण्याची ट्रस्टची इच्छा आहे.मोठ-मोठ्या अभियंत्यांचा चमूही अयोध्येत उपस्थित आहे.

अयोध्या -राम मंदिर निर्माणाला लवकरच सुरूवात होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेला भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.  या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांचे उत्तराधिकारी महंत कमल नयन दास यांनी सांगितले, ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहून भूमी पूजनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. मत्र, पंतप्रधान या कार्यक्रमाला उपस्थत राहणार की नाही, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळालेली नाही. 

महंत कमल नयन दास यांनी पूर्वीच सांगितले होते, की श्रावन महिन्यातच राम मंदिर निर्माणाचे भूमीपूजन करण्याची ट्रस्टची इच्छा आहे. मात्र, अद्याप अयोध्येतील रम मंदिराच्या कामाला सुरुवात केव्हा होणार हे निश्चित झालेले नाही. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी शनिवारी दुपारी अयोध्या सर्किट हाऊसमध्ये श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची महत्वपूर्ण बैठन होत आहे. या बैठकीला मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रादेखील उपस्थित राहणार आहेत.

नृपेंद्र मिश्रा 16 जुलैपासून अयोध्येत आहेत. त्यांच्यासोबत बीएसएफचे माजी महासंचालक आणि राम जन्मभूमी ट्रस्टचे संरक्षण सल्लागार के के शर्मादेखील पोहोचले आहेत. याशिवाय मोठ-मोठ्या अभियंत्यांचा चमूही अयोध्येत उपस्थित आहे. राम मंदिराचे मॉडेल तयार करणारे चंद्रकांत सोमपुरा यांच्याशिवाय त्यांचा मुलगा निखिल सोमपुरा, हेदेखील अयोध्येत पोहोचले आहेत. तेही या बैठकीत सहभागी होऊ शकतात.

मंदिर निर्माणासंदर्भात सातत्याने अंदाज लावले जात आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत मंदिर निर्माणाची तारीख निश्चित होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : खूशखबर! जगातली पहिली कोरोना लस ऑगस्‍टमध्ये येणार, 'हा' देश 3 कोटी डोस बनवणार 

रशियाचं नवं 'ब्रह्मास्त्र' S-500, आकाशात उपग्रहांचाही करेल खात्मा

गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात

"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

 

Read in English

Web Title: Bhoomi poojan for Ayodhya Ram temple likely on 5th august 2020 pm modi may visit ayodhya to attend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.