भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:58 IST2025-10-20T18:57:36+5:302025-10-20T18:58:13+5:30
Pawan Singh wife Jyoti Singh contest in Bihar Elections: आपल्या पतीवर आरोप केल्यामुळे ज्योती सिंह आल्या होत्या चर्चेत

भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
Pawan Singh wife Jyoti Singh contest in Bihar Elections: वैयक्तिक आयुष्यातील वादामुळे चर्चेत असलेले भोजपुरी स्टार पवन सिंगची पत्नी ज्योती सिंग यांनी आज रोहतासमधील कराकट येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षातून त्या निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू होती. पण अखेर आज त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. लोकांची सेवा करण्यासाठी आणि प्रदेशाचा विकास करण्यासाठी राजकारणात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. सारे लोक हेच कुटुंब, पक्ष आणि सहयोगी आहेत, असेही त्या म्हणाल्या.
पवन सिंह यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी अनपेक्षित कामगिरी केली होती, पण त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. वृत्तानुसार, या पराभवानंतरही पवन सिंह यांच्या पत्नी ज्योती सिंह या परिसरातील लोकांशी जोडल्या गेल्या, त्यांची सुख-दु:ख समजून घेतली. म्हणूनच त्यांना परिसरातील लोकांचा पाठिंबा असल्याचा त्यांचा दावा आहे.
VIDEO | Bihar: Bhojpuri star Pawan Singh's wife Jyoti Singh files nomination as independent candidate from Karakat.
— Press Trust of India (@PTI_News) October 20, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/jF0OwgAUIz
पवन सिंह यांची पत्नी ज्योती सिंह अलिकडेच चर्चेत आली. त्याचे कारण त्यांचे वैयक्तिक आयुष्य होते. ज्योती सिंह यांनी पवन सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर पवन सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, पण आता ज्योती सिंह निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
पवन सिंह यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ज्योती सिंह त्यांच्याकडून सतत तिकीट मागत होत्या, ज्यावर ते नियंत्रण ठेवू शकत नव्हते. यापूर्वी असेही वृत्त होते की ज्योती या तेजस्वी यादव यांच्या पक्षाकडून किंवा प्रशांत किशोर यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा रंगली होती. पण त्यांनी तिकीट देण्यात आले नाही.