Bhojpuri Singer Nisha Upadhyay : प्रसिद्ध भोजपुरी गायिका निशा उपाध्याय सध्या चर्चेत आली आहे. मात्र, ती नवीन गाण्यामुळे नाही, तर एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये निशा उपाध्याय लाईव्ह स्टेज शोमध्ये अँकरवर प्रचंड संतापल्याचे दिसते. यादरम्यान, ती अँकरला मारण्यासाठी चक्क चप्पल काढल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
स्टेज शोदरम्यान घडला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रम सुरू असताना अँकरने निशा उपाध्यायच्या मानधनाबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील टिप्पणी केली. ही टिप्पणी ऐकताच गायिकेचा संयम सुटला आणि तिने स्टेजवरच जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे भोजपुरी इंडस्ट्रीतील लाईव्ह शोमध्ये वाढत चाललेली अश्लीलता आणि कलाकारांशी होणारे गैरवर्तन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
निशा उपाध्यायचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये स्टेजवर मोठी गर्दी दिसत असून, निशा उपाध्याय हातात चप्पल घेऊन अँकरकडे धावताना दिसते. त्यांच्यासोबत असलेले लोकही संतापलेले दिसतात. सोशल मीडियावर अनेक युजर्स निशाच्या कृतीचे समर्थन करत आहेत. कलाकारांशी गैरवर्तन करणाऱ्यांना असाच धडा शिकवायला हवा, अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
लाईव्ह शोदरम्यान निशा उपाध्याय यांनी आरोप केला की, अँकर त्यांना भर मंचावर त्यांचा ‘रेट’ विचारत होता. ही बाब अत्यंत अपमानास्पद असल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली. हा व्हिडीओ ‘The Bihar’ या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला असून, त्यासोबत भोजपुरी स्टेज शो सॉफ्ट पॉर्नकडे झुकत असल्याची टीकाही करण्यात आली आहे. पोस्टमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, सरकार एकीकडे डीजेवर बंदी घालत आहे, मात्र अश्लील आणि फूहड स्टेज शोवर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
कोण आहे निशा उपाध्याय?
निशा उपाध्याय भोजपुरी संगीतसृष्टीतील एक लोकप्रिय नाव आहे. ती मूळच्या बिहारमधील सारण जिल्ह्यातील गौर बसंत गावची रहिवासी असून, सध्या पाटण्यात राहते. आपल्या दमदार आवाजामुळे आणि लोकगीतांच्या खास शैलीमुळे बिहारसह देशभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या कार्यक्रमांना अनेकदा हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित असतात.
Web Summary : Bhojpuri singer Nisha Upadhyay slapped an anchor onstage after he allegedly made a lewd comment about her fee. The incident, reportedly in Gorakhpur, sparked outrage and highlighted concerns about vulgarity in live shows and disrespect towards artists.
Web Summary : भोजपुरी गायिका निशा उपाध्याय ने कथित तौर पर अपनी फीस पर अश्लील टिप्पणी करने पर मंच पर एक एंकर को थप्पड़ मार दिया। गोरखपुर की इस घटना ने लाइव शो में अश्लीलता और कलाकारों के प्रति अनादर पर आक्रोश जताया।