शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भिवापूर.. लाईनमन मृत्यू

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

विद्युत खांबावरून पडल्याने लाईनमनचा मृत्यू

विद्युत खांबावरून पडल्याने लाईनमनचा मृत्यू
सावरगाव येथील घटना : वादळामुळे वीजपुरवठा खंडित
भिवापूर : बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत खांबावर चढलेल्या लाईनमनचा तोल गेल्याने तो खाली पडला. यात गंभीर दुखापत झाल्याने लाईनमनचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील सावरगाव येथे बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
फत्तू वातूजी बागडे (५७, रा. भिवापूर) असे मृत लाईनमनचे नाव आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यात सोसाट्याच्या वादळासह पावसाने हजेरी लावली. तडाख्याच्या वादळामुळे अनेक ठिकाणच्या विद्युत तारा लोंबकळल्याने विद्युत पुरवठा बंद झाला होता. दरम्यान, वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती कामे सुरू केली. तालुक्यातील सावरगाव येथे दुरुस्ती कामे करण्यासाठी फत्तू बागडे हे वीज खांबावर चढले होते. दरम्यान, त्यांचा अचानक तोल गेल्याने ते खाली पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. सदर लाईनमनचा खांबावरून पडल्याने मृत्यू झाल्याचा प्रथमदर्शनी अंदाज असला तरी शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. यासंदर्भात वीज कंपनीचे अभियंता अजय कोलते यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. (तालुका प्रतिनिधी)