Bhind Accident : बस अन् कंटेनरचा भीषण अपघात, 7 जण जागीच ठार तर 13 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 09:37 AM2021-10-01T09:37:22+5:302021-10-01T09:52:21+5:30

Bhind Accident : अपघाताची घटना घडताच मोठा गोधळ सुरू झाला. प्रवाशांची ओरड आणि मदतीच्या याचनेने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

Bhind Accident : 7 killed, 13 injured in bus-container accident in bhind madhya pradesh | Bhind Accident : बस अन् कंटेनरचा भीषण अपघात, 7 जण जागीच ठार तर 13 जखमी

Bhind Accident : बस अन् कंटेनरचा भीषण अपघात, 7 जण जागीच ठार तर 13 जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देभिंडचे पोलीस अधीक्षक यांनी या घटनेची माहिती देताना बसमधील 13 प्रवासी जखमी असून त्यातील 4 जणांनी प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली. येथील राष्ट्रीय महामार्गावर बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक बसली. या भीषण दुर्घटनेत 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 13 जण जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात येत असून स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. 

अपघाताची घटना घडताच मोठा गोधळ सुरू झाला. प्रवाशांची ओरड आणि मदतीच्या याचनेने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. गोहद चौक ठाणे परिक्षेत्रातील डॉग बिरखडी येथे ही घटना घडली. 

भिंडचे पोलीस अधीक्षक यांनी या घटनेची माहिती देताना बसमधील 13 प्रवासी जखमी असून त्यातील 4 जणांनी प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले आहे. तसेच, या जखमींना ग्वालियर येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचेही एसपी मनोज सिंग यांनी सांगितले. 
 

Read in English

Web Title: Bhind Accident : 7 killed, 13 injured in bus-container accident in bhind madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.