भिकार सोंडा गाव पाण्यापासून वंचित
By Admin | Updated: March 21, 2015 00:09 IST2015-03-20T22:40:04+5:302015-03-21T00:09:56+5:30
साल्हेर ग्रुप ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार

भिकार सोंडा गाव पाण्यापासून वंचित
साल्हेर ग्रुप ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
निकवेल : बागलाण तालुक्यातील आदिवासी भागातील साल्हेर ग्रुप ग्रामपंचायतीमधील भिंकार सोंडा गावामध्ये ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे आदिवासी ग्रामस्थाना पाणी असून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. बागलाण तालुक्यातील खोर्यातील साल्हेर ग्रामपंचायत अंतर्गत भिकार सोंडा हे गाव येते सदर गावाची पाणी पुरवठा करणारी विहिरीला पाणी आहे. तरी या गावातील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करणार्या विहिरीमधुन पाणी मिळत नसल्याची तक्रार, ग्रामपंचायत सदस्य देवमन गवळी, अभिमन गवळी, सोमनाथ पवार, प्रकाश गवळी, रमेश गवळी यांनी केली आहे. सदर साल्हेर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे मनमानी कारभार करत आहे. तसेच कुठल्याही प्रकारे शासकीय योजनेची माहिती सदस्यांना देत नाहीत भिकार सोंडा येथे गावाला पाणी पुरवठा सुरळीत करावा असे अनेक महिन्यापासून सागत आहे, सदर गावाला पाणीपुरवठा करणार्या विहिरीला पाणी आहे, तरीही ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करीत आहे. ग्रामसेवक उडवा उडवीचे उत्तर देतात, यामुळे ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
विद्युत पुरवठा करणार्या साहित्यासाठी ग्रामपंचायतकडे निधी नसल्याकारणाने गेल्या सात ते आठ महिन्यापासुन भिंकार सोंडा हे आदिवासी गाव पाणी असून पाणी टंचाईला सामोरे जात आहे.
ग्रामसेवक हे गेल्या सात ते आठ महिन्यापासून साल्हेर ग्रामपंचायतीचे कारभार बघत आहे मग भिंकार सोंडा गाव हे पाणी असून पाणी टंचाईला सामोरे जात आहे. या संदर्भात बागलाण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे.एम. बहिरम यांच्याकडेही ग्रामस्थांनी ग्रामसेवकाबद्दल तक्रारी केल्या. तरीही भिंकार सोंडा हे पाणी असुन पाणी टंचाईला सामोरे जात आहे. या संदर्भात संबंधित ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
साल्हेर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीमध्ये आठवड्यामध्ये एकदा येतात व निघुन जातात. भिंकार सोंडा ा गावामध्ये पाणी असून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. संबधित अधिकार्यांनी तात्काळ ग्रामसेवकाला पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत. - देवमन गवळी