भिडेंचा भाजपशी संबंध नाही, त्यांच्यावर कारवाई होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 06:20 IST2023-07-31T06:19:25+5:302023-07-31T06:20:49+5:30
महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. महानायक म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते.

भिडेंचा भाजपशी संबंध नाही, त्यांच्यावर कारवाई होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे भिडेंना राजकीय आश्रय असल्याचाही आरोप होत असताना, कुणीही याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देऊ नये, भिडेंचा भाजपशी संबंध नाही. राज्य सरकार त्यांच्यावर उचित कारवाई करेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नागपुरात उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधच आहे. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. महानायक म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते.
मुंबईत तक्रार दाखल
वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांच्या नेतृत्त्वात तक्रार दाखल केली आहे.