शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

"2024 च्या निवडणुकीत जगातील सर्वात मोठ्या पक्षाची विजयाच्या दिशेनं वाटचाल!" US मिडिया भाजपवर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 16:01 IST

जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, अमेरिकेच्या दृष्टिनेही भाजप हा सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे...

देशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे (BJP) अमेरिकन मिडियाने जबरदस्त कौतुक केले आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने भाजप जगातील सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर 2014, 2019 मध्ये बम्पर विजयानंतर 2024 मध्ये भाजप पुन्हा एकदा मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. आगामी काळात भाजप भारतात वेगाने आपले वर्चस्व प्रस्थापित करेल, असेही या जर्नलमध्ये म्हणण्यात आले आहे.

जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, अमेरिकेच्या दृष्टिनेही भाजप हा सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने (WSJ) आपल्या लेखात म्हटले आहे की, 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन विजय मिळवल्यानंतर, भारतीय जनता पक्ष 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजयाकडे कूच करत आहे. याच बरोबर भारत एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत असल्याचेही यात लेखात म्हणण्यात आले आहे.

अमेरिका भारताशिवाय चीनचा सामना करू शकत नाही -याशिवाय, अमेरिका भारताच्या मदतीशिवाय चीनचा सामना करू शकत नाही, असेही वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या या लेखात म्हटले आहे. हा लेख प्रकाशित झाल्यानंतर भाजप नेते अरुण सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वात भाजप सातत्याने वाढत आहे आणि संपूर्ण जग पीएम मोदी आणि भाजपच्या धोरणांचे कौतुक करत आहे, असे अरुण सिंह यांनी म्हटले आहे.

43 वर्षांतील भाजपचा विस्तार - - 1981 मध्ये संपूर्ण देशात भाजपचे केवळ 148 आमदार होते, आज त्यांची संख्या 1296 एवढी झाली आहे.- 1984 मध्ये भाजपचे केवळ दोन खासदार होते, आज हा आकडा 303 वर गेला आहे.- 1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 1.89 कोटी मते मिळाली होती, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 22.89 कोटी मते मिळाली आहेत.- आज भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपकडे 17 कोटींहून अधिक कार्यकर्ते आहेत. तर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडे 9.14 कोटी कार्यकर्ते आहेत.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहAmericaअमेरिकाUSअमेरिका