शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

भारतरत्न: ते शिल्पकार होते लालकृष्ण अडवाणी; रथयात्रेमुळे राजकारणाला कलाटणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 6:14 AM

या यात्रेमुळे देशाच्या राजकारणात भाजपचा पाया मजबूत झाला आणि त्याचे शिल्पकार हाेते लालकृष्ण अडवाणी.

अयाेध्येमध्ये श्रीराम मंदिरात श्रीरामलल्ला विराजमान झाले. श्रीराम मंदिरासाठी सुरू झालेल्या आंदाेलनाने देशाच्या राजकारणाला कलाटणी दिली. त्यातही सर्वात महत्त्वाची ठरली ती रथयात्रा. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात ही रथयात्रा काढण्यात आली. या यात्रेमुळे देशाच्या राजकारणात भाजपचा पाया मजबूत झाला आणि त्याचे शिल्पकार हाेते लालकृष्ण अडवाणी.

१९८९च्या लाेकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. अशा वेळी भाजपने जनता दलाला श्रीराम मंदिराच्या मुद्द्यावरून बाहेरून पाठिंबा दिला. सरकार स्थापन झाल्यानंतरही श्रीराम मंदिराबाबत काेणताही ताेडगा काढण्याच्या हालचाली दिसत नव्हत्या. त्यावेळी भाजप नेत्यांनी अयाेध्येतील वादग्रस्त जागेवर कारसेवा करण्याचे जाहीर केले. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी भाजपचे अध्यक्ष हाेते. सरकारने ताेडगा न काढल्यास कारसेवा अटळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर देशभरात कारसेवेची तयारी सुरू झाली. समित्या स्थापन झाल्या. सप्टेंबर १९९०मध्ये अडवाणी हे पत्नी कमला यांच्यासाेबत चर्चा करीत असताना पक्षाचे सरचिटणीस प्रमाेद महाजन तेथे पाेहाेचले. त्यावेळी अडवाणी यांनी सर्वप्रथम यात्रा काढण्याचा विचार मांडला. साेमनाथ ते अयाेध्या पदयात्रा काढण्याचा मी विचार करीत असल्याचे ते म्हणाले. पदयात्रेऐवजी रथयात्रा काढण्याची कल्पना महाजन यांना सुचली.  मिनी बस किंवा मिनी ट्रकला रथाचे स्वरूप देऊन तुम्ही त्यातून जावे, असे महाजन अडवाणी यांना म्हणाले. 

अडवाणी यांनी याबाबत काहीसा विचार केला. अखेर त्यांनी रथयात्रेला हाेकार दिला. प्रमाेद महाजन यांनी रथयात्रेचे नियाेजन आणि व्यवस्थेची जबाबदारी घेतली. २५ सप्टेंबर १९९० राेजी साेमनाथ येथून रथयात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर इतिहास घडला. 

लालू प्रसाद यादव यांनी राेखली हाेती रथयात्रादेशभरात लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेल्या रथयात्रेला जाेरदार प्रतिसाद मिळत हाेता. एक वेळ अशी हाेती, ज्यावेळी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी राज्यात कारसेवकांवर गाेळीबार करण्याचे आदेश दिले हाेते. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्याचदरम्यान, बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रथयात्रा समस्तीपूरमध्ये राेखली आणि अडवाणी यांना अटक केली. 

वाजपेयींशी घट्ट मैत्री

एकेकाळी लाेकसभेत भाजपचे केवळ २ खासदार हाेते. हा आकडा १९९९ मध्ये १८२वर पाेहाेचला. २ ते १८२ या प्रवासात भाजपच्या दाेन दिग्गज नेत्यांची प्रमुख भूमिका राहिली. ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी. या दाेघांची अतिशय घट्ट मैत्री हाेती. वाजपेयी हे श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासाेबत देशव्यापी दाैऱ्यावर हाेते. त्यावेळी काश्मीरला जाताना काेटा रेल्वे स्थानकावर त्यांची भेट झाली. अडवाणी हे त्यावेळी राजस्थानात संघाचे प्रचारक हाेते. वाजपेयी यांच्यासाेबत त्यांनी काही दिवस राजस्थानचा दाैरा केला हाेता. त्यांच्या वक्तृत्व काैशल्याने अडवाणी भारावून गेले हाेते. दाेन्ही नेत्यांची शैली तसेच बलस्थाने वेगळी हाेती. परंतु, दाेघांचा एकमेकांवर प्रचंड विश्वास हाेता. 

मित्रासाठी साेडले पद १९९५मध्ये नाेव्हेंबर महिन्यात भाजपचे मुंबईत अधिवेशन सुरू हाेते. त्यावेळी लाेकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी लालकृष्ण अडवाणी यांचे नाव जाहीर हाेईल, अशी चर्चा हाेती. मात्र, अडवाणींनी भाषण सुरू केले आणि म्हणाले, ‘अबकी बारी अटल बिहारी.’ या वाक्याने स्वत: वाजपेयी चकीत झाले. 

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीBJPभाजपाBharat Ratnaभारतरत्न