Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेदरम्यान चिमुकलीला घातली सँडल; राहुल गांधींनी जिंकलं सर्वांचं मन, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 17:52 IST2022-09-18T17:42:34+5:302022-09-18T17:52:34+5:30
Rahul Gandhi : भारत जोडो यात्रे दरम्यान एका कार्यकर्त्यांसोबत एक लहान मुलगी राहुल गांधींच्या सोबत चालत होती. अचानक राहुल गांधींची नजर तिच्या पायाकडे गेली. त्या मुलीच्या पायातील सँडल निघाली होती.

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेदरम्यान चिमुकलीला घातली सँडल; राहुल गांधींनी जिंकलं सर्वांचं मन, फोटो व्हायरल
काँग्रेसची भारत जोडो यात्रा, सध्या केरळमध्ये दाखल झाली आहे. पक्षाचे शेकडो कार्यकर्ते व नेते या यात्रेत सहभागी झाले आहेत. राजकारणातील जाणकारांच्या मते या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसला पुन्हा रुळावर आणता येईल. त्यामुळे ती यशस्वी करण्यासाठी काँग्रेसकडून प्रत्येक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याच यात्रेदरम्यान राहुल गांधींचा (Rahul Gandhi) एक फोटो आणि व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. राहुल गांधींच्या एका कृतीने सर्वांचच मन जिंकल्याचं पाहायला मिळत आहे.
भारत जोडो यात्रे दरम्यान एका कार्यकर्त्यांसोबत एक लहान मुलगी राहुल गांधींच्या सोबत चालत होती. अचानक राहुल गांधींची नजर तिच्या पायाकडे गेली. त्या मुलीच्या पायातील सँडल निघाली होती. राहुल गांधींनी त्या मुलीसोबत असणाऱ्या व्यक्तीला थांबवत सँडल निघाल्याचं सांगितलं. मात्र नंतर स्वत: चं खाली वाकून त्या मुलीला सँडल घालण्यात मदत केली आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे फोटो शेअर केले आहेत. सध्या या फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे.
#BharatJodoYatra में दिखा एक खूबसूरत लम्हा...
— Congress (@INCIndia) September 18, 2022
हम कदम से कदम मिला रहे हैं, हर मुश्किल को आसान कर, सभी को साथ लेकर आगे बढ़ रहे हैं, क्योंकि हम सभी को अपना मानते हैं, उनका ख़्याल रखना जानते हैं। pic.twitter.com/2YYHjEmvlV
काँग्रेसने "भारत जोडो यात्रा में दिखा एक खूबसूरत लम्हा... हम कदम से कदम मिला रहे हैं, हर मुश्किल को आसान कर, सभी को साथ लेकर आगे बढ़ रहे हैं, क्योंकि हम सभी को अपना मानते हैं, उनका ख़्याल रखना जानते हैं" असं म्हणत राहुल गांधींच्या फोटो शेअर केला आहे. राजस्थान (Rajasthan) आणि दिल्लीतील (Delhi) काँग्रेस कार्यकारीणीनंतर आज छत्तीसगड (Chhattisgarh) काँग्रेसनेहीराहुल गांधींना (Rahul Gandhi) पक्षाध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला आहे. काल हा ठराव जयपूर आणि दिल्लीतही मंजूर झाला. राहुल गांधींचे मन वळवण्याच्या काँग्रेस नेत्यांकडून प्रयत्न होत आहे. याचाच भाग म्हणून विविध राज्यात ठराव मंजूर केले जात आहेत.
राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करण्याची मागणी
छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीने काँग्रेसच्या भावी अध्यक्षांना प्रदेशाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि इतर एआयसीसी (All India Cngress Comitee) प्रतिनिधी नियुक्त करण्याचे अधिकारही दिले आहेत. पक्षाचे राज्य मुख्यालय 'राजीव भवन' येथे झालेल्या बैठकीत हे दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. बैठकीनंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) म्हणाले की, त्यांनी राहुल गांधींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.