अहमदाबाद - जिद्द असेल तर माणूस परिस्थितीसमोर हार न मानता काहीही साध्य करू शकतो, असं म्हटलं जातं. ही बाब एका कैद्याने तंतोतंत खरी करून दाखवली आहे. साधारणपणे तुरुंगात गेल्यानंतर कैद्याचं आय़ुष्य हे नैराश्यमय होतं किंवा असे कैदी आधीच्यापेक्षा अधिक सराईत गुन्हेगार बनतात. मात्र तुरुंगात गेल्यानंतर आपल्या पुढील जीवनाला चांगली दिशा देणारे कैदी फारच थोडे असतात. असंच एक दुर्मीण उदाहरण गुजरातमधून समोर आलं आहे.गुजरातमधील भावनगर येथील भानूभाई पटेल यांनी तुरुंगात राहून आठ वर्षांत दोन चार नव्हे तर तब्बल ३१ पदव्या मिळवल्या. त्यांच्या या कर्तृत्वामुळे तुरुंगातून बाहेर पडताच सरकारी नोकरी मिळवली. भानूभाई एवढ्यावरच थांबले नाहीत तर नोकरी मिळाल्यानंतर पुढच्या पाच वर्षांत त्यांनी अजून २३ पदव्या मिळवल्या. त्यामुळे भानूभाईंचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये नोंद झाले.५९ वर्षांच्या वर्षांचे भानूभाई पटेल हे मूळचे भावनगरमधील महुवा तालुक्यातील रहिवासी आहेत. अहमादाबादमधील बीजे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर १९९२ मध्ये मेडिकलच्या पदवीसाठी ते अमेरिकेत गेले होते. तिथे त्यांचा एक मित्र विद्यार्थी व्हिजावर काम करून आपला पगार भानूभाईंच्या खात्यात ट्रान्सफर करत असे. त्यामुळे त्यांच्यावर फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन अॅक्टच्या उल्लंघनाचा आरोप झाला होता. तसेच वयाच्या ५० व्या वर्षी १० वर्षांची शिक्षा झाली. त्यामुळे त्यांना अहमदाबादमधील कारागृहात १० वर्षे शिक्षा भोगावी लागली. याकाळात त्यांनी आठ वर्षांत एकूण ३१ पदव्या मिळवल्या.
तुरुंगवासादरम्यान ८ वर्षांत मिळवल्या ३१ पदव्या, बाहेर पडताच मिळाली सरकारी नोकरी
By बाळकृष्ण परब | Updated: November 9, 2020 11:03 IST
Education News : तुरुंगात गेल्यानंतर आपल्या पुढील जीवनाला चांगली दिशा देणारे कैदी फारच थोडे असतात. असंच एक दुर्मीण उदाहरण समोर आलं आहे.
तुरुंगवासादरम्यान ८ वर्षांत मिळवल्या ३१ पदव्या, बाहेर पडताच मिळाली सरकारी नोकरी
ठळक मुद्देगुजरातमधील भावनगर येथील भानूभाई पटेल यांनी तुरुंगात राहून आठ वर्षांत दोन चार नव्हे तर तब्बल ३१ पदव्या मिळवल्या