शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

Bhajanlal Sharma : राजस्थानचे नवे मुख्यमंत्री आहेत कोट्यवधींचे मालक! संपत्ती आणि कर्ज किती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 17:25 IST

Bhajanlal Sharma : राजस्थानचे नवे मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा यांनी सांगानेरमधून निवडणूक जिंकली आहे.

राजस्थानला नवे मुख्यमंत्री मिळाले असून मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. नोव्हेंबरमध्ये पाच राज्यांमध्ये झालेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपाने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांचा सस्पेंस संपवला आहे. दोन्ही राज्यांमध्ये हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून नवीन चेहरे आणले आणि आता राजस्थानमध्येही तेच दिसून आलं. 

मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव (MP CM Mohan Yadav) यांना मुख्यमंत्री म्हणून निवडलं आहे, तर छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय (Chattisgarh CM Vishnu Dev Sai) यांच्याकडे या राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मध्य प्रदेश आणि  छत्तीसगड प्रमाणेच राजस्थानचे भावी मुख्यमंत्रीही कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. राजस्थानचे नवे मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा यांनी सांगानेरमधून निवडणूक जिंकली आहे. 

भजनलाल शर्मा हे करोडपती आहेत आणि त्याची एकूण संपत्ती 1.40 कोटी रुपये आहे, तर 35 लाखांचं कर्ज आहे. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या संपत्तीच्या तपशिलाशी संबंधित प्रतिज्ञापत्रानुसार, राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या एकूण संपत्तीपैकी 1,15,000 रुपये रोख आहेत, तर विविध बँकांमधील खात्यामध्ये जवळपास 11 लाख रुपये आहेत. 

शर्मा यांच्याकडे तीन तोळं सोनं आहे, ज्याची किंमत 1,80,000 रुपये आहे. त्यांनी शेअर्स किंवा बाँड्समध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही, परंतु त्यांच्याकडे LIC आणि HDFC Life च्या दोन विमा पॉलिसी आहेत, ज्यांची किंमत 2,83,817 रुपये आहे. याशिवाय वाहनांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या नावावर टाटा सफारी आहे, ज्याची किंमत पाच लाख रुपये प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली आहे, याशिवाय एक टीव्हीएस व्हिक्टर मोटारसायकल असून ज्याची किंमत  35,000 रुपये आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपा