"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 19:04 IST2025-11-08T19:00:36+5:302025-11-08T19:04:31+5:30
“मी हे सर्व शेअर करत आहे कारण कोणत्याही महिलेला असा अनुभव येऊ नये. ना कॅबमध्ये, ना बाइकवर, कुठेही नाही,”

"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअॅक्शन
बेंगलोरमध्ये एका रॅपिडो बाइक चालकावर महिला प्रवाशाने छेडछाडीचा आरोप केला आहे. प्रवासादरम्यान चालकाने तिचा पाय पकडण्याचा प्रयत्न केला, असा संबंधित महिलेचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ स्वतः महिलेनं तयार केला असून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना गुरुवारी, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडली. विल्सन गार्डन पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर रॅपिडो कंपनीनेही निवेदन जारी करत आहे. “ग्राहकांची सुरक्षा आणि सुविधा हे आमची सर्वोच्च प्राधान्य आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच, आमची टीम लवकरच आपल्याशी संपर्क साधेल,” असेही म्हटले आहे.
महिलेने ही घटना आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केली आहे. तिने म्हटले आहे, “मी चर्च स्ट्रीटवरून माझ्या पीजीकडे परतत होते. त्या वेळी रॅपिडो कॅप्टनने बाइक चालवताना माझ्या पायाला हात लावण्याचा प्रयत्न केला. हे एवढे अचानक घडले की, मला काहीच समजले नाही, व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासही वेळ मिळाला नाही. मी विरोध केला, ‘भैया, क्या कर रहे हो, मत करो,’ असे म्हटले. पण त्याने पुन्हा तसे केले.”
महिलेने पुढे सांगितलं की, मी अपरिचित ठिकाणी असल्याने चालकाला थांबण्यास सांगण्याची स्थिती नव्हते. यानंतर मी जेव्हा माझ्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा एक अनोळखी व्यक्ती परिस्थिती बघून काय झाले, असे विचारले. मी त्याला घडलेला प्रकार सांगितला. मदतीसाठी आला. परिस्थिती ऐकल्यावर त्या व्यक्तीनं चालकाला जाब विचारला. यानंतर रॅपिडो चालकाने मझी माला मागितली, पण निघताना त्याने हातवारे केले. यामुळे मला अधिक असुरक्षित वाटू लागले.
महत्वाचे म्हणजे, “मी हे सर्व शेअर करत आहे कारण कोणत्याही महिलेला असा अनुभव येऊ नये. ना कॅबमध्ये, ना बाइकवर, कुठेही नाही,”
महिलेच्या या इन्स्टा पोस्टनंतर, या प्रकरणावर रॅपिडो कंपनीनेही प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने म्हटले आहे, “आपल्यासोबत रॅपिडो चालकाकडून घडलेल्या अनुचित प्रकाराबद्दल आम्हाला अत्यंत खेद आहे. आपली सुरक्षा आणि सुविधा हे आमची सर्वोच्च प्राधान्य आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी कृपया आम्हाला थोडा वेळ द्यावा. आमची टीम लवकरच आपल्याशी संपर्क साधेल. या घटनेतील कॅप्टनविरोधात योग्य कारवाई केली जाईल."