आनंदनगरमध्ये भागवत कथा ग्रंथदिंडीने प्रारंभ

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:13+5:302015-09-01T21:38:13+5:30

अहमदनगर : श्रुती संगीत निकेतन व श्रीगुरू तबला विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदनगर, गुलमोहोर रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला सोमवारी सायंकाळी प्रारंभ झाला. यानिमित्त सावेडी भागातून भागवत ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली होती.

Bhagwant Kendra in Anandanagar starts with the book | आनंदनगरमध्ये भागवत कथा ग्रंथदिंडीने प्रारंभ

आनंदनगरमध्ये भागवत कथा ग्रंथदिंडीने प्रारंभ

मदनगर : श्रुती संगीत निकेतन व श्रीगुरू तबला विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदनगर, गुलमोहोर रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला सोमवारी सायंकाळी प्रारंभ झाला. यानिमित्त सावेडी भागातून भागवत ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली होती.
शिलाविहार ते आनंदनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर अशी दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीत श्रुती संगीत निकेतन, श्रीगुरू तबला विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, दादेगाव (तालुका आष्टी) येथील ग्रामस्थ, स्थानिक नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. या ज्ञानयज्ञ सोहळ्यात सज्जनगड येथील मोहनबुवा रामदासी उपस्थित राहणार आहेत. ६ सप्टेंबरपर्यंत सुरू असलेल्या या कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात मंदार रामदासी कथा निरुपण करीत आहेत. कथा निरुपणाला असलेल्या संगीतमय साथीने श्रोते मंत्रमुग्ध झाले. कथासोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमास माजी नगरसेविका संगीता खरमाळे, डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर, नंदकिशोर भावे, श्रीमती शैलजा थोरवे, हर्षद भावे, धनश्री खरवंडीकर, मकरंद खरवंडीकर उपस्थित होते. या सोहळ्यात भक्तिसंगीत, नामजप, दहिहंडी, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.
----
फोटो- ०१ भागवत कथा
आनंदनगर येथील आयोजित भागवत कथा सोहळ्याच्या निमित्ताने सोमवारी सावेडीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यामध्ये मंदार रामदासी यांच्यासह आयोजक व नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: Bhagwant Kendra in Anandanagar starts with the book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.