शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

'सुवर्ण मंदिरातून भगतसिंग यांचा फोटो काढा', त्या वादग्रस्त खासदाराची धक्कादायक मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 20:09 IST

शहीद-ए-आज़म भगतसिंग यांना दहशतवादी म्हटल्यानंतर खासदार सिमरनजीत सिंग मान यांनी पुन्हा एक नवा वाद निर्माण केला आहे.

चंदीगड: शहीद-ए-आज़म भगतसिंग यांना दहशतवादी म्हटल्यानंतर आता खासदार सिमरनजीत सिंग मान यांनी पुन्हा एकदा नवा वाद निर्माण केला आहे. मान यांच्या नेतृत्वाखालील शिरोमणी अकाली दल (अमृतसर) ने सुवर्ण मंदिराच्या सेंट्रल शीख संग्रहालयातून भगतसिंग यांचा फोटो काढण्याची मागणी केली आहे. 

सिमरनजीत सिंग मानचा मुलगा इमान सिंग मानच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एसजीपीसी अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी यांना पत्र दिले आहे. भगतसिंग स्वत:ला नास्तिक मानत असल्याने त्यांचा फोटो संग्रहालयातून काढून टाकण्यात यावा, असे त्या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे, संगरुर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्यापासून सिमरनजीत सिंग मान एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधाने करत आहेत. 

मान अजूनही आपल्या शब्दावर ठाम महान क्रांतिकारक भगतसिंग यांना दहशतवादी म्हटल्यानंतर अकाली दल (अमृतसर)चे सुप्रीमो सिमरनजीत सिंग मान यांनी जाहीरपणे माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर दिल्ली भाजप नेत्याने मान यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांची तुलना दहशतवादाशी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपण आपल्या शब्दावर ठाम असून, माफी मागणार नाही, असे मान म्हणाले होते. पण जेव्हा या प्रकरणाने जोर धरला तेव्हा मान यांनी आपल्या शब्दांचा विपर्यास केल्याचा आरोप केला आणि दिल्लीतच काउंटर एफआयआर दाखल केला.

टॅग्स :Bhagat SinghभगतसिंगPunjabपंजाब