दे दणादण! कॉलर पकडली, लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण; आपापसात भिडले 2 पोलीस कर्मचारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 13:56 IST2023-10-17T13:44:53+5:302023-10-17T13:56:52+5:30

दोघांमध्ये पहिलं भांडण सुरू झालं. पुढे हा वाद टोकाला गेला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

bhagalpur scuffle between two soldiers for tractor challan video viral | दे दणादण! कॉलर पकडली, लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण; आपापसात भिडले 2 पोलीस कर्मचारी

फोटो - आजतक

बिहारच्या भागलपूरमधून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी आपापसात भांडताना दिसत आहेत. दोघांमध्ये पहिलं भांडण सुरू झालं. पुढे हा वाद टोकाला गेला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कोणीतरी त्यांचा भांडणाचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

ही घटना जीरोमाईल औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आपापसात भांडणाऱ्यांपैकी एक ट्रॅफिक पोलीस आहे आणि दुसरा डायल 112 कॉन्स्टेबल आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्रॅक्टरला वाहतूक पोलिसांनी पकडलं. त्यानंतर 7000 रुपयांचं चलन देण्याबाबत बोलू लागला. पण हा ट्रॅक्टर डायल 112 मध्ये उपस्थित असलेल्या होमगार्डचा आहे हे त्याला माहीत नव्हतं.

डायल 112 हा सिव्हिल ड्रेसमधील कॉन्स्टेबल हेल्मेट न घालता मोटारसायकलवरून वाहतूक पोलिसाकडे आला. त्यानंतर ट्रॅफिक पोलिसांचे एसआय आणि दोन कॉन्स्टेबल यांनी त्या डायल 112 वाहनाच्या होमगार्ड जवानाशी जोरदार हाणामारी सुरू केली. डायल 112 कॉन्स्टेबलचा ट्रॅक्टर जप्त करून त्याला 2000 रुपयांचे चलन बजावण्यात आलं.

डायल 112 च्या कॉन्स्टेबलने ट्रॅफिक पोलिसाला तुला बघून घेईन असं म्हटलं. त्यानंतर रस्त्याच्या मधोमध दोघांची हाणामारी झाली. यावेळी तिथे उभी असलेली लोकं ही संपूर्ण घटना पाहत होते. गर्दीतील कोणीतरी त्यांचा हा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. आता या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bhagalpur scuffle between two soldiers for tractor challan video viral