शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:56 IST

महिलेने फ्लाईट अटेंडंट आणि केबिन क्रूला थेट प्लेन क्रॅश करण्याची धमकी दिल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली.

बंगळुरूमधील कँपेगौडा विमानतळावर एका महिला प्रवाशाने खूप गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने फ्लाईट अटेंडंट आणि केबिन क्रूला थेट प्लेन क्रॅश करण्याची धमकी दिल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यानंतर फ्लाईट टेक ऑफ करण्याआधीच तिला विमानातून खाली उतरवण्यात आलं.

येलहंका येथील रहिवासी असलेली व्यास हिरल मोहनभाई नावाची एक महिला प्रवाशी १७ जून रोजी बंगळुरूहून सूरतला जाण्यासाठी कँपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (KIA) वर पोहोचली. जेव्हा ती सूरतला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX2749F विमानात चढली, तेव्हा तिने तिचं सामान सीट क्रमांक २०F वर ठेवलं होतं, जी तिची सीट नव्हती.

सीटवर सामान ठेवण्यावरून वाद

केबिन क्रूने यानंतर महिलेला तिचं सामान काढण्याचा सल्ला दिला. तरीही तिने तसं करण्यास नकार दिला आणि एअरलाइन स्टाफशीशी भांडण केलं. महिलेने केबिन क्रू तसेच इतर प्रवाशांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे बोर्डिंग प्रक्रियेत व्यत्यय आला. याच दरम्यान महिलेने केबिन क्रूला प्लेन क्रॅश करण्याची धमकी दिली.

टेकऑफपूर्वीच विमानातून उतरवलं खाली महिलेच्या कृतीमुळे परिस्थिती इतकी बिकट झाली की, विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तिला टेकऑफपूर्वीच विमानातून खाली उतरवलं आणि विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातून उतरल्यानंतरही महिला विमानतळ कर्मचाऱ्यांशी वाद घालत राहिली. तिने पोलीस स्टेशनमधील एका महिला स्टाफवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. कँपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये महिलेविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :BengaluruबेंगळूरairplaneविमानAirportविमानतळ