अबब! बॅगेत कोब्रा घेऊन शाळेत पोहोचला विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 11:36 IST2018-07-04T11:29:55+5:302018-07-04T11:36:03+5:30

तामिळनाडूच्या एका शाळेत घडलेला अजब प्रकार ऐकून तुम्हाला धक्काच बसेल

bengaluru snake in bag boy walks 1km to school | अबब! बॅगेत कोब्रा घेऊन शाळेत पोहोचला विद्यार्थी

अबब! बॅगेत कोब्रा घेऊन शाळेत पोहोचला विद्यार्थी

बेंगळुरु : तामिळनाडूच्या एका शाळेत घडलेला अजब प्रकार ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. बेंगळुरुतील कामराजनगर परिसरातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या बॅगेत चक्क एक कोब्रा आढळल्याची घटना समोर आली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्याला याबाबत काहीच कल्पना नव्हती.  

शाळेत पोहोचल्यावर विद्यार्थ्याने नेहमीप्रमाणे अभ्यासासाठी बॅग उघडली असता त्याला पुस्तकांमध्ये कोब्रा असल्याचं लक्षात आलं आणि धक्काच बसला. परंतु, प्रसंगावधान राखत, न डगमगता त्याने झटक्यात आपली बॅग वर्गाबाहेर फेकली. त्यामुळे मोठाच अनर्थ टळला. विद्यार्थ्याने बॅगेत न पाहताच हात घातला असता तर अघटित घडलं असतं, असं शाळेतील शिक्षकाने सांगितलं.   

विद्यार्थ्याने त्याची बॅग दोन दिवसांपूर्वी घरातील एका कोपऱ्यात ठेवली होती. ती न उघडताच तो शाळेत घेऊन आला होता. त्यामुळे हा कोब्रा त्याच्या घरात शिरला असावा आणि त्याने बॅगेचा आसरा घेतला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: bengaluru snake in bag boy walks 1km to school