Video - धक्कादायक! मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर हायव्होल्टेज ड्रामा; पोलिसांना केली शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 11:38 IST2023-08-08T11:36:37+5:302023-08-08T11:38:14+5:30
एका मुलीने दारूच्या नशेत पोलिसांना खूप शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही सोडलं नाही, मद्यधुंद अवस्थेत त्यांना देखील शिवीगाळ केली.

Video - धक्कादायक! मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर हायव्होल्टेज ड्रामा; पोलिसांना केली शिवीगाळ
बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलीने दारूच्या नशेत पोलिसांना खूप शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही सोडलं नाही, मद्यधुंद अवस्थेत त्यांना देखील शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मुलगी रविवारी रात्री उशिरा बंगळुरूमधील चर्च स्ट्रीटवर पोलीस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करताना दिसत आहे.
पोलीस असं असतानाही शांत राहून तिची शिवीगाळ ऐकताना दिसत आहेत. त्याचवेळी ते तिला तिच्या घरी सुखरुप सोडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. ही संपूर्ण घटना रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही तरुणी पोलिसांसह ये-जा करणाऱ्या प्रत्येकाला शिवीगाळ करत आहे. मुलीला घरी नेण्यासाठी पोलिसांनी दुसऱ्या महिलेची मदत घेतली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मद्यधुंद तरुणीने महिलेला वारंवार मारहाण केली आणि ऑटोरिक्षात बसण्यास नकार दिला. कर्नाटकातील बंगळुरू येथील चर्च स्ट्रीट परिसरात घडलेल्या या घटनेवरून या भागात अनेक पब, बार आणि रेस्टॉरंट असल्याचे स्पष्ट होते. मद्यधुंद तरुणीने तिची कार नो पार्किंग झोनमध्ये उभी केल्याची माहिती समोर आली आहे. नो-पार्किंग झोनमध्ये तरुणीने कार पार्क करण्यास वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतल्याने यावरून तरुणी आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद झाला.
तरुणीने यानंतर पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेत तरुणीने पोलिसाची कॉलरही पकडली. पोलिसांनी या तरुणीवर कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याचे स्पष्ट झाले. दारूच्या नशेत पोलिसांशी गैरवर्तन करणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे अशा अनेक प्रकारची कारवाई त्याच्यावर होऊ शकली असती. मात्र पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.