शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
2
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
3
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
4
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
5
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
6
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
7
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
8
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
9
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
10
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
11
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
12
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
13
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
14
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
15
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
16
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
17
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...
18
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
19
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
20
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती

Video: चालकाला अचानक आला झटका; ९ वाहनांवर चढवली बस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 17:45 IST

झटका आल्यामुळे चालकाने ब्रेकऐवजी चुकून अॅक्सिलरेटर दाबले.

बंगळुरू- शहरात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी BMTC बसच्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत. पहिला अपघात चिन्नास्वामी स्टेडियमजवळ, तर दुसरा राजाजीनगरमध्ये झाला. दोन्ही घटनांमुळे शहरात वाहतूक विस्कळीत झाली असून BMTC प्रशासन आणि वाहतूक सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

चिन्नास्वामी स्टेडियमजवळ एका बीएमटीसी बसने नियंत्रण गमावले आणि नऊ वाहनांना धडक दिली. चालकाला अचानक झटका आल्याने चुकून अ‍ॅक्सिलरेटर दाबला गेला. या अपघातात एका ऑटोचालकाला गंभीर दुखापत झाली असून, इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर क्यूबन पार्क वाहतूक पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे, ज्यात चालकाला झटका आल्याने बस वेगाने पुढे वाहनांना एकामागोमाग एक धडक देताना दिसते. बसच्या कंडक्टरने बस थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

राजाजीनगरमध्ये ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

शहरातील दुसरी घटना राजाजीनगरमधील पंचजन्य विद्यापीठ शाळेजवळ घडली. ९ वर्षीय मुलगी आपल्या दोन बहिणींसह रस्ता ओलांडत असताना BMTC बसने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरुन पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bus driver's seizure causes 9-vehicle pileup; girl dies in accident.

Web Summary : Bangalore saw two BMTC bus accidents. Near Chinnaswamy Stadium, a driver's seizure caused a 9-vehicle collision. In Rajajinagar, a 9-year-old girl died after being hit by a bus. Driver fled; police are investigating.
टॅग्स :AccidentअपघातBus DriverबसचालकBengaluruबेंगळूरcctvसीसीटीव्ही