पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला कोणताही पर्याय नाही. तसंच कोणताही राज्यात याचं स्थान घेऊ शकत नाही. तृणमूल काँग्रेसला केवळ तृणमूल काँग्रेस हाच एक पर्याय आहे," असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशा परिस्थितीत आतापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या बैठकीदरम्यान कोणताही पक्ष आपल्या पक्षाची जागा घेऊ शकत नाही आणि तृणमूल काँग्रेसनं जनतेच्या हिताची कामं करणारं जागातील चांगलं सरकार दिल्याचंही त्या म्हणाल्या.यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. "भाजपनं सोनार भारत संपवला आणि आता ते सोनार बांगलाची गोष्ट करत आहेत. भगवा दल सोशल मीडियाच्या माध्यमातून दुष्प्रचार करत आहे. अम्फान चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी आम्ही शक्य ती मदत केली. परंतु एक दोन गोष्टींसाठी आम्हाला टीकेचा सामना करावा लागला," असंही बॅनर्जी म्हणाल्या.
बंगाल : तृणमूल काँग्रेसला राज्यात पर्याय नाही, कोणत्याही पक्षानं जागा घेणं अशक्य - ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 21:18 IST
ममता बॅनर्जींनी केला भाजपवर हल्लाबोल
बंगाल : तृणमूल काँग्रेसला राज्यात पर्याय नाही, कोणत्याही पक्षानं जागा घेणं अशक्य - ममता बॅनर्जी
ठळक मुद्देभाजपानं देश विकल्याचा ममता बॅनर्जींनी केला आरोपसोनार भारत संपवणारे सोनार बांगालाच्या गोष्टी करतायत, बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल