SIR साठी पश्चिम बंगाल तयार नाही; ममता सरकारचे निवडणूक आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:31 IST2025-08-08T15:30:39+5:302025-08-08T15:31:44+5:30

बिहारमध्ये SIR द्वारे मतदार यादीतील सुधारणा पूर्ण झाली आहे.

Bengal is not ready for SIR at present; Mamata government asks Election Commission for 2 years | SIR साठी पश्चिम बंगाल तयार नाही; ममता सरकारचे निवडणूक आयोगाला पत्र

SIR साठी पश्चिम बंगाल तयार नाही; ममता सरकारचे निवडणूक आयोगाला पत्र

बिहारमधील मतदार यादी सुधारण्या(SIR) ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावरुन सध्या बराच गदारोळ सुरू आहे. आता पश्चिम बंगालमध्येही SIR बाबत लवकरच पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. मात्र, बंगालमध्ये SIR लागून होण्यात अडचणी येऊ शकतात. बंगाल सरकारने शुक्रवारी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून याबद्दल माहिती दिली आहे. त्या पत्रात बंगालचे मुख्य सचिव मनोज पंत म्हणाले की, राज्य अद्याप SIR साठी तयार नाही. मतदार यादीतील सुधारणा आता करता येणार नाही, त्यासाठी किमान दोन वर्षे लागतील.

अलीकडेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून म्हटले होते की, बंगाल SIR साठी तयार आहे, परंतु आता बंगाल सरकारने ते पत्र फेटाळले आहे. मुख्य सचिवांनी राज्याची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाला घाईघाईने पत्र पाठवले. त्यांनी स्पष्ट केले की, अद्याप SIR ची वेळ आलेली नाही. 

भाजपची टीका
दरम्यान, ममता सरकारे SIR नाकारल्यामुळे भाजपने जोरदार टीका केली. केंद्रीय राज्यमंत्री सुकांता मजुमदार म्हणाले, तृणमूल सरकारला कोणत्याही प्रकारे एसआयआरला थांबवायचे आहे. जर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली, तर रोहिंग्यांच्या मतांनी जिंकलेले हे सरकार हरेल. मात्र, देशाचे सार्वभौमत्व वाचवण्यासाठी आयोग निश्चितच पावले उचलेल, अशी प्रतिक्रिया मजुमदार यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते अरुप चक्रवर्ती यांनी दावा केला की, एसआयआरसोबत तमाशा सुरू आहे. राहुल गांधींनी माहिती गोळा करून मतांची चोरी दाखवली आहे. निवडणूक आयोगाने प्रथम त्याचे उत्तर द्यावे.

Web Title: Bengal is not ready for SIR at present; Mamata government asks Election Commission for 2 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.