मुस्लीम असल्याने सलमान खानला शिक्षा - पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 22:52 IST2018-04-05T22:48:59+5:302018-04-05T22:52:11+5:30
सलमान खान हा अल्पसंख्यक समाजातील असल्यामुळे त्याला शिक्षा सुनावण्यात आली, अशी मुक्ताफळे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी यांनी उधळली आहेत.

मुस्लीम असल्याने सलमान खानला शिक्षा - पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री
नवी दिल्ली : 1998च्या काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्याची रवानगी जोधपूरच्या तुरुंगात करण्यात आली आहे. दरम्यान, सलमान खानला शिक्षा झाल्याबद्दल त्याच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर, सलमान खान हा अल्पसंख्याक समाजातील असल्यामुळे त्याला शिक्षा सुनावण्यात आली, अशी मुक्ताफळे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी यांनी उधळली आहेत.
#Pakistan minister trolled for giving communal colour to #SalmanKhan's conviction#BlackBuckPoachingCase#SalmanKhanConvicted
— ANI Digital (@ani_digital) April 5, 2018
Read @ANI story | https://t.co/LWrIwUmMEepic.twitter.com/IU4OYyMrPq
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, सलमान खान हा अल्पसंख्याक समाजातील असल्यामुळे त्याला शिक्षा सुनावण्यात आली. तो भारतातील सत्ताधारी पक्षाच्या धर्माचा असता तर त्याला अशी कठोर शिक्षा देण्यात आली नसती. न्यायालय सुद्धा त्याच्याशी सौम्य वागले असते.
1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने गुरुवारी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरवले. या प्रकरणी न्यायालयाने त्याला पाच वर्षांचा तुरूंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर सलमान खान याला जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये नेण्यात येणार असून आज त्याला जामीन मिळण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे किमान आजचा दिवस तरी सलमान खानला तुरूंगातच काढावा लागणार आहे. हा निकाल सलमान खानसाठी मोठा झटका मानला जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील सहआरोपी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.