प्रीतीचा चाहता असल्याने वाडियांना धमकावले- रवि पुजारी
By Admin | Updated: June 21, 2014 17:14 IST2014-06-21T13:48:44+5:302014-06-21T17:14:20+5:30
मी प्रीती झिंटाचा चाहता असल्याने नेस वाडियांना फोन करुन धमकावले अशी कबूली अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

प्रीतीचा चाहता असल्याने वाडियांना धमकावले- रवि पुजारी
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २१- मी प्रीती झिंटाचा चाहता असून ऐवढ्या कठीण परिस्थितीत प्रीतीला कोणीही पाठिंबा दिला नाही. म्हणून मी नेस वाडियांना फोन करुन धमकावले अशी कबूली अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. हा फोन करण्यामागे खंडणीचा उद्देश नाही असे त्याने म्हटले आहे.
प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यात वाद निर्माण झाला असून प्रीतीने नेस वाडियांविरोधात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणात नेस वाडियांचे वडिल नसली वाडिया यांना अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीकडून फोन आणि एसएमएसद्वारे धमकी आल्याने नवीन वळण आले आहे. शनिवारी रवी पुजारीने एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी फोनवरुन संवाद साधला. यात रवी पुजारी म्हणतो, प्रीती झिंटाला पाठिंबा देण्यासाठी मी वाडियांना फोन केला. मला नेस वाडियांशी बोलायचे होते. म्हणून मी नसली वाडियांच्या फोनवर संपर्क केला. आधी त्यांना एसएमएस केला. मात्र त्यांनी उत्तर न दिल्याने शेवटी कॉल केला.
'नसली वाडियांच्या महिला सेक्रेटरीला मी इंग्रजीत फक्त ऐवढेच बोललो की प्रीती झिंटाला त्रास देऊ नका. आणखी काही नाही. हा खंडणीचा फोन नाही' असे स्पष्टीकरण पुजारीने दिले असून 'मी माझ्यापद्धतीने बोललो. आता त्यांना तो धमकावणारा कॉल वाटत असेल तर मी काय करु असा सवालही त्याने उपस्थित केला.
नसली वाडिया हे वजनदार व्यक्ती असून अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे घनिष्ट संबंध असल्याने त्यांच्याविरोधात कोणी बोलत नाही. प्रीती झिंटा ही सध्या घाबरली असून तिला धमकवण्यात आले आहे असा दावाही पुजारीने केला. वाडियांनी प्रीतीसोबतचे सर्व वाद संपवायला हवे असेही त्यांनी सांगितले.